शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक!, बेळगावात दागिन्यासाठी महिलेचा खून, संशयित ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2025 18:20 IST

बेळगाव : अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याबरोबरच तिचा गळा दाबून खून करून अंगावरील अन्य दागिने लंपास ...

बेळगाव : अपार्टमेंटमध्ये घुसलेल्या चोरट्याने एका महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावण्याबरोबरच तिचा गळा दाबून खून करून अंगावरील अन्य दागिने लंपास केल्याची खळबळजनक घटना लक्ष्मीनगर, गणेशपूर बेळगाव येथे सोमवारी (दि.२१) रात्री उघडकीस आली आहे. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.खून झालेल्या महिलेचे नाव अंजना अजित दड्डीकर (वय ५४, रा. लक्ष्मीनगर गणेशपूर) असे आहे. तिचे पती अजित दड्डीकर हे ऑटो रिक्षा चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवतात. लक्ष्मीनगर येथील अपार्टमेंटमध्ये राहणारे हे एकमेव पती-पत्नी होते. रात्री ऑटो रिक्षा घेऊन अजित घरी परतल्यानंतर आपल्या पत्नीवर हल्ला झाल्याचा प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. प्रसंगावधान राखून घरात जमिनीवर बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या अंजना यांना त्यांनी तातडीने सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेऊन दाखल केले.मात्र डॉक्टरांनी अंजना यांना मृत घोषित केले. चोरट्याने अंजना यांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र, सोन्याची कर्णभूषणे, हातातील सोन्याची अंगठी आणि सोन्याच्या बांगड्या हिसकावून तिचा खून केल्याचा दड्डीकर परिवारातील सदस्यांचा आरोप आहे. दरम्यान पोलिसांनी चाकूने वार करून खून केल्यानंतर चोरटा दागिने घेऊन फरारी झाला असल्याचा संशय व्यक्त केला आहे.सदर चोरी व खुनाच्या प्रकाराची माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलिस उपायुक्त निरंजनाराजे अरस, कॅम्प पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अल्ताफ मुल्ला व अन्य अधिकाऱ्यांनी काल रात्री तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिस अधिकाऱ्यांनी अपार्टमेंटमध्ये चौकशी करण्याबरोबरच संपूर्ण पाहणी केली. यावेळी पोलिस श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनादेखील पाचारण करण्यात आले होते.त्यानंतर कॅम्प पोलिस वेगाने तपासाची चक्रे फिरवून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे. दरम्यान अंजना दड्डीकर यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला की त्यामध्ये अन्य काही कारण आहे? याचा तपास केला जात आहे. चोरी व खुनाच्या या घटनेमुळे लक्ष्मीनगर गणेशपूर येथे खळबळ उडाली असून याप्रकरणी कॅम्प पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरKarnatakकर्नाटकbelgaonबेळगावtheftचोरीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस