उपवन तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2019 19:55 IST2019-05-01T19:53:50+5:302019-05-01T19:55:25+5:30

ठाणे पश्चिममधील वागळे इस्टेट परिसरातील रुपदेवी पाडा क्रमांक २ मध्ये ही महिला राहत होती.

The woman has suicide in Upvan lake | उपवन तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

उपवन तलावात उडी घेऊन महिलेची आत्महत्या

ठळक मुद्देठाण्यात राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेचा मृतदेह काल रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागला.  भेकानी जलधारी यादव या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे.

ठाणे - ठाण्यातील उपवन तलावात उडी घेऊन महिलेने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. ठाण्यात राहणाऱ्या 49 वर्षीय महिलेचा मृतदेह काल रात्री उशिरा पोलिसांच्या हाती लागला. भेकानी जलधारी यादव या महिलेने तलावात उडी घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. ठाणे पश्चिममधील वागळे इस्टेट परिसरातील रुपदेवी पाडा क्रमांक २ मध्ये ही महिला राहत होती.

महिलेने आत्महत्या केल्याची माहिती रात्रीच्या सुमारास मिळाल्यानंतर पोलिसांनी तलावात शोध मोहीम हाती घेतली. बघ्यांची देखील काही प्रमाणावत गर्दी झाली होती. त्यानंतर काही वेळातच महिलेचा मृतदेह पोलिसांच्या हाती लागला. भेकानी यादवच्या आत्महत्येचं कारण अद्याप कळालेलं नाही. पोलीस  पुढील तपास करत आहेत.

Web Title: The woman has suicide in Upvan lake