कर्जाला कंटाळून महिलेची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2019 19:52 IST2019-06-12T17:47:59+5:302019-06-12T19:52:58+5:30
तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

कर्जाला कंटाळून महिलेची आत्महत्या
ठळक मुद्देबँकेच्या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटनासिलिंग पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.
नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर परिसरातील राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेने बँकेच्या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सोमवारी रात्री घडली आहे. तुळींज पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
नालासोपारा पूर्वेकडील शिर्डी नगर येथील महावीर नगर बिल्डिंगच्या डी विंगमधील सदनिका नंबर 201 मध्ये राहणाऱ्या संगीता प्रदीप दुबे (32) यांनी दोन ते तीन बँकेतून खाजगी कर्ज घेतले होते. या कर्जाच्या ताणतणावाला कंटाळून संगीता यांनी सोमवारी रात्री पावणे दहाच्या सुमारास सिलिंग पंख्याला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.