शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

बाथरूममध्ये स्कार्फने लावून महिलेने केली आत्महत्या : १ महिन्यापासून सुरु होती कोरोनाशी झुंज  

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2021 17:27 IST

Suicide News : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाच्या आत्महत्येची वर्षभरात ही दुसरी घटना आहे.

ठळक मुद्देमिरज सिव्हिलमध्ये कोरोनाबाधित महिलेची आत्महत्या सुमन गणेश कुंभार (वय ४२, रा. सुभाषनगर, ता. मिरज) या महिला रुग्णाने रुग्णालयात बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली.

मिरज : मिरज शासकीय कोविड रुग्णालयात उपचार घेणाऱ्या सुमन गणेश कुंभार (वय ४२, रा. सुभाषनगर, ता. मिरज) या महिला रुग्णाने रुग्णालयात बाथरूममध्ये गळफास लावून आत्महत्या केली. कोविड रुग्णालयातील बाथरूममध्ये सुमन कुंभार यांनी सोमवारी पहाटे ५ वाजता स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली. औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. महिन्यापासून कोरोनावर मात करण्यासाठी धडपड सुरु होती.

कोविड बाधित झाल्याने सुमन यांच्यावर गेले महिनाभर उपचार सुरू होते. त्यांची ऑक्सिजन पातळी कमी जास्त होत असल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयातून दि. १३ मे रोजी मिरज शासकीय कोरोना रुग्णालयात दाखल केले होते. दोन दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात येणार होता. मात्र त्यापूर्वीच सोमवारी त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत कुंभार यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. आत्महत्येचे नेमके कारण समजलेले नसले तरी औषधोपचाराला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा होती. याबाबत गांधी चाैक पोलिसांत नोंद आहे. 

 

रुग्णालयात आत्महत्येची दुसरी घटनामिरज शासकीय कोविड रुग्णालयात कोविड रुग्णाच्या आत्महत्येची वर्षभरात ही दुसरी घटना आहे. नऊ महिन्यांपूर्वी हुसेन बाबूमिया मोमीन या रुग्णानेही उपचार सुरू असताना चाकूने स्वताचा गळा कापून आत्महत्या केली होती. आज सुमन कुंभार या रुग्णाच्या आत्महत्येमुळे सिव्हिलमध्ये खळबळ उडाली होती.

टॅग्स :Deathमृत्यूCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसhospitalहॉस्पिटलcorona virusकोरोना वायरस बातम्या