प्रियकराला बनवलं भाऊ, पत्नीच्या करकुतीची सुसाईड नोट लिहून पतीनं घेतला गळफास
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 15:46 IST2023-02-13T15:46:19+5:302023-02-13T15:46:41+5:30
नीतू घरात तंत्र-मंत्रही करायची. काही दिवसांपूर्वी नीतूला कृष्णासोबत गार्डनमध्ये पकडले होते.

प्रियकराला बनवलं भाऊ, पत्नीच्या करकुतीची सुसाईड नोट लिहून पतीनं घेतला गळफास
इंदूर - मध्य प्रदेशातील इंदूर येथे आत्महत्येची खळबळजनक घटना समोर आली आहे. लसूडिया इथं राहणाऱ्या व्यक्तीनं गळफास घेत आत्महत्या केली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी पोहचले. तिथे पोलिसांना सुसाईड नोट सापडली. त्यात आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीनं पत्नीच्या अनैतिक संबंधांचा उल्लेख केला आहे.
महालक्ष्मी नगरमध्ये राहणाऱ्या हितेश पालनं राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केली. जीव देण्यापूर्वी सुसाईड नोटमध्ये हितेशनं लिहिलंय की, माझी पत्नी नीतू पालचे कृष्णा राठौरसोबत अनैतिक संबंध आहेत. हे लोक मला जीवे मारण्याची धमकी देत आहेत. अनेकदा मी त्यांना एकांतात पकडले आहे. नीतू घरात तंत्र-मंत्रही करायची. काही दिवसांपूर्वी नीतूला कृष्णासोबत गार्डनमध्ये पकडले होते.
त्याचसोबत एक अन्य महिलाही त्यात सहभागी आहे. तिचं नाव राणी उदास आहे. नीतू आणि कृष्णाच्या व्हॉट्सअप चॅटवर मी नजर ठेवली होती. त्यात गार्डनमध्ये भेटल्यानंतर तिथून नीतू कृष्णाच्या रुमवर गेली. ती कृष्णाला महागडे गिफ्ट द्यायची. तो माझा भाऊ आहे असं सांगत ती पैशांची व्यवहार करायची. नीतूने काही दिवसांपूर्वी प्रियकर कृष्णाला एक मोठी कार गिफ्ट केली. ही कार नीलूच्या नावावर आहे असं पतीने मृत्यूपूर्वी म्हटलंय.
माझ्या मृत्यूला तिघे जबाबदार
त्याने पुढे लिहिलं की, नीतू, कृष्णा आणि राणी घरी एकत्र तंत्र-मंत्र करत असत. गेल्या १ वर्षापासून ते स्लो पॉयझन देत होते. यामुळे मी सुस्त होऊ लागलो. माझे संपूर्ण शरीर काळे झाले आहे. हे सर्व शवविच्छेदनात कळेल. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांच्या चॅटची चौकशी करून त्यांना शिक्षा करावी. पत्नीने मला काहीतरी खाऊ घालून संपूर्ण मालमत्ता तिच्या नावावर करून घेतली आहे, मृत्यूनंतर ही संपत्ती त्याचा मुलगा युवराज आणि आई-वडिलांना द्यावी. तिला मला मारायचे होते. त्यामुळेच तिने सर्वत्र नॉमिनी म्हणून तिचं नाव टाकलं आहे. माझ्या मृत्यूला हे तीन लोक जबाबदार आहेत असं पतीने सांगितले. या प्रकरणी आत्महत्येचा गुन्हा नोंद करून तपासाला सुरुवात केली आहे.