बहिणीला मारहाण करायचा पती; भावांनी कपडे फाटेपर्यंत धू धू धुतलं; रुग्णालयात दाखल करावं लागलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2021 22:31 IST2021-07-14T22:24:49+5:302021-07-14T22:31:39+5:30

पोलिसांकडून दोघांचा शोध सुरू; मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल

woman brother beat up brother in law video viral police case bharatpur rajasthan | बहिणीला मारहाण करायचा पती; भावांनी कपडे फाटेपर्यंत धू धू धुतलं; रुग्णालयात दाखल करावं लागलं

बहिणीला मारहाण करायचा पती; भावांनी कपडे फाटेपर्यंत धू धू धुतलं; रुग्णालयात दाखल करावं लागलं

भरतपूर: राजस्थानच्या भरतपूरमधील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. दोन तरुणांनी स्वत:च्या भावजींना हात-पाय बांधून बेदम मारहाण केली आहे. पीडित व्यक्तीचे कुटुंबीय बाहेर उभे राहून घटनेचा व्हिडीओ काढत होते. या दरम्यान त्यांनी अनेकदा पीडित व्यक्तीला सोडण्याची मागणी केली. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भरतपूरमधील मथुरा गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या गोपालगढ परिसरात हा प्रकार घडला. पत्नीच्या दोन भावांनी हात-पाय बांधून, तोंडात कपडा कोंबून बेदम मारहाण केल्याची तक्रार टिंकू नावाच्या व्यक्तीनं पोलिसांत दाखल केली आहे. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केलं असून त्याच्या मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

दोन वर्षांपूर्वी टिंकूचा विवाह मडरपूर गावातल्या का तरुणीशी झाला. त्यांच्यात सातत्यानं वाद व्हायचे. टिंकू त्याच्या पत्नीला अनेकदा मारहाण करायचा असा आरोप आहे. टिंकू सतत मारहाण करत असल्यानं पत्नी चिंतेत होती. तिनं ही बाब तिच्या भावांना सांगितली. त्यानंतर दोन भावांनी टिंकूच्या घरी जाऊन त्याला बेदम मारहाण केली.

'दोन मेहुणे अचानक माझ्या घरात घुसले. त्यांनी मला एका खोलीत नेऊन माझे हात पाय बांधले. माझ्या तोंडात एक कपडा कोंबला. मला बेदम मारहाण केली. मी स्वत:ची सुटका करून घेण्याचे प्रयत्न केले. मात्र ते मला मारतच होते,' अशी तक्रार टिंकूनं केली आहे. व्हायरल व्हिडीओत दोन तरुण एका व्यक्तीला हात पाय बांधून मारहाण करताना दिसत आहेत. या मारहाणीत त्याचे कपडे फाटले आहेत. त्याचे कुटुंबीय खिडकीतून आरोपींकडे गयावया करत आहेत. सध्या पोलीस दोन्ही आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: woman brother beat up brother in law video viral police case bharatpur rajasthan