सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक; ठाण्यातील प्रकार; कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2025 13:05 IST2025-06-02T13:04:32+5:302025-06-02T13:05:08+5:30

दहा हजारांच्या बदल्यात मुलीला दाेन हजार रुपये

Woman broker running sex racket arrested; Thane incident; Case registered in Kopri police | सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक; ठाण्यातील प्रकार; कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल

सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दलाल महिलेस अटक; ठाण्यातील प्रकार; कोपरी पोलिसांत गुन्हा दाखल

लाेकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: पैशांच्या आमिषाने गरीब, गरजू, महिला आणि तरुणींना देहविक्रयाच्या व्यवसायात ढकलणाऱ्या एका दलाल महिलेस ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने अटक केली. तिच्याविरोधात काेपरी पाेलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला. तिच्या साथीदाराचा शाेध सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेने दिली.

काेपरीतील ट्वीन्स हाॅटेलमध्ये एका महिलेमार्फत सेक्स रॅकेट चालविले जात असल्याची माहिती ठाणे गुन्हे अन्वषेणच्या अनैतिक मानवी वाहतूक शाखेला मिळाली हाेती. या माहितीच्या आधारे पाेलिस उपायुक्त अमरसिंह जाधव, सहायक पाेलिस आयुक्त शेखर बागडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक चेतना चाैधरी यांच्या पथकाने २८ मे राेजी हाॅटेलमध्ये बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा लावला. त्यावेळी त्या महिलेने अन्य एका दलालाच्या मदतीने एका २० वर्षीय तरुणीला पैशांच्या आमिषाने देहविक्रीसाठी आणल्याचे आढळले. हे उघड हाेताच महिलेसह तिच्या साथीदाराविरूद्ध गुन्हा दाखल केला.

दहा हजारांच्या बदल्यात मुलीला दाेन हजार रुपये

या कामात जास्त पैसे मिळतात. तुम्हालाही जादा पैसे दिले जातील, असे  एका दलालाने त्या दलाल महिलेला सांगितले. कस्टमरचे काॅल आल्यानंतर ताे या महिलेकडे मुलींना साेपवायचा. ही महिला त्यांना घेऊन गिऱ्हाईकांकडे जायची. एका मुलीच्या बदल्यात दहा हजार रुपये मिळाल्यानंतर त्यातील दाेन हजार रुपये त्या मुलीला दिले जायचे. उर्वरित आठ हजार रुपये ही महिला आणि तिचा साथीदार वाटून घेत हाेते.

Web Title: Woman broker running sex racket arrested; Thane incident; Case registered in Kopri police

टॅग्स :Arrestअटक