शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नानंतर १८ दिवसातच नववधूने दाखवला रंग, दागिने, पैसे घेऊन झाली फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2022 19:19 IST

Crime News : लग्नापूर्वी मनीषाने सांगितले होते की, सीता ही एक साधी घरगुती मुलगी आहे आणि ती एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे.

राजस्थानच्या जालोर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूसह एका महिला दलालास अटक केली आहे. पोलिसांनी सांगितले की, भीनमालच्या माघ कॉलनीत राहणारा अभिषेक उर्फ ​​धरमचंद जैन याने कलेल्या तक्रारीत त्याने सीता गुप्ता नावाच्या महिलेशी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्न केल्याची माहिती दिली. स्वरूपगंजमध्ये राहणाऱ्या मनीषा सेनच्या मध्यस्तीतून हा विवाह झाला होता. लग्नापूर्वी मनीषाने सांगितले होते की, सीता ही एक साधी घरगुती मुलगी आहे आणि ती एका चांगल्या मुलाच्या शोधात आहे.यानंतर अभिषेक आणि सीता यांची भेट होऊ लागली आणि दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू झाले. त्यानंतर 03 जानेवारी 2022 रोजी दोघांनी लग्न केले. मात्र 21 जानेवारी रोजी घरातील कपाटात ठेवलेले 1 लाख 45 हजार रुपये आणि 5 तोळे सोन्याचे दागिने घेऊन सीता फरार झाली. सासरच्यांनी वधूचा शोध घेतला मात्र ती कुठेच सापडली नाही. यानंतर घरातील वॉर्डरोब तपासण्यात आला. ज्यामध्ये ठेवलेले सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम गायब होती. त्यानंतर लगेचच पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली.

गायीजवळ लघुशंका केल्यानं वृद्धास मारहाण, व्हिडीओ व्हायरल झाल्यांनतर पोलिसांची कारवाईघरातून रोख रक्कम आणि दागिने घेऊन वधू फरारवधूला पकडण्यासाठी पोलीस अधिकारी लक्ष्मण सिंह चंपावत यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार करण्यात आले.  फोन सर्विलंसच्या मदतीने महिला दलाल मनीषा सेन हिला प्रथम अटक करण्यात आली आणि तिची कसून चौकशी करण्यात आली. ज्यात तिने आपला गुन्हा कबूल केला. यानंतर पोलिसांनी चोरीचा माल घेऊन पळून गेलेल्या नववधूला पकडण्यासाठी सापळा रचून तिलाही लवकरच अटक केली.पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केलीत्यांच्याकडून पोलिसांनी चोरीचा मुद्देमाल जप्त केला आहे. वधू उत्तर प्रदेशातील असल्याचे सांगितले जात आहे. ति च्याकडून सापडलेल्या सोन्याचे दागिने तपासण्यात येत आहेत. आता या महिलेने अशा किती घटना घडवल्या याचा शोध घेण्याचा प्रयत्न पोलीस करत आहेत.

टॅग्स :RobberyचोरीPoliceपोलिसUttar Pradeshउत्तर प्रदेशRajasthanराजस्थानmarriageलग्न