शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
3
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
4
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
5
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
6
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
7
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
8
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
9
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
10
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
11
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
12
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
13
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
14
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
15
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार
16
सोन्याच्या दरात मोठी घसरण; १० ग्रॅम सोन्यासाठी किती करावा लागणार खर्च, जाणून घ्या
17
पाकिस्तानला जाणारे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
18
"पहलगाममध्ये हल्ला करणारे दहशतवादी नव्हेत तर स्वातंत्र्यसैनिक’’, पाकिस्तानच्या उपपंतप्रधानांचं विधान 
19
Pahalgam Terror Attack : पहलगाममधील भाजपा कार्यकर्त्यासाठी नजाकत बनला 'देवदूत'; पत्नीचा, लेकीचा वाचवला जीव
20
चीननं उचललं मोठं पाऊल, भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर्स क्रॅश; विकण्यासाठी गुंतवणूकदारांची रांग

नवऱ्याच्या संमतीने ‘ती’ थाटते लग्नाळू तरुणांशी संसार; पूजाचा आठ जिल्ह्यांत धुडगुस

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 07:34 IST

अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली होती.

लोकमत न्यूज नेटवर्क  बीड : पतीच्या संमतीने एक विवाहित महिला लग्नाळू तरुणांशी संसार थाटते. हे वाचून आश्चर्य वाटेल, पण खोट्या लग्नाची हीच खरी गोष्ट आहे.  पूजा कचरू निलपत्रेवार (२७, रा. तालाबकट्टा, मानवत, जि. परभणी) असे या आरोपी महिलेचे नाव आहे. कधी नवरी, कधी करवली तर कधी नवरीची बहीण बनून तिने सुशिक्षितांनाही गंडविल्याची माहिती आहे.   

अडीच लाख रुपये देऊन वसमत (जि. परभणी) येथे मुद्रांकावर लग्न लावून आणलेली नवरी करवलीसह पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना नवरदेवाने पकडून पोलिसांच्या स्वाधीन केली होती. यानंतर बनावट लग्न लावणाऱ्या टोळीचा पर्दाफाश झाला होता. या प्रकरणातील नवरी अल्पवयीन निघाली असून, ती सध्या अंबाजोगाईच्या सुधारगृहात आहे. करवली बनून आलेली मीना बळीराम बागल (२७) ही न्यायालयीन कोठडीत आहे.  

या प्रकरणात १२ डिसेंबरला पोलिसांनी मुक्तीराम गोपीनाथ भालेराव (३१, रा. रिधोरा, जि. परभणी), प्रभाकर शिवाजी दशरथे उर्फ आकाश बालाजी माने (३५, रा. जोड परळी, जि. परभणी), विनोद किसन खिलारे (४४, रा. शिवणी बु., जि. हिंगोली), जयशीला प्रभाकर कीर्तने (३५, रा. अस्वला, जि. हिंगोली), पूजा कचरू निलपत्रेवार (२७) या पाच जणांना अटक केली. या सर्वांना १९ डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावलेली आहे.  मास्टरमाईंड पूजा निलपत्रेवार हिने कोठडीत गोंधळ घातला, शिवाय ती गर्भवती आहे. त्यामुळे पुन्हा पोलिस कोठडी घेण्याच्या अटीवर न्यायालयाने १५ डिसेंबरला तिला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. 

पूजावर चार गुन्हे नोंद पूजा व तिच्या सहकाऱ्यांनी औरंगाबाद, बीड, परभणी, हिंगोली, धुळे, जळगाव, नाशिक व  परराज्यातही बनावट लग्न लावून फसविल्याची माहिती समोर आली आहे. पूजावर परभणीतील नानलपेठ, दैठणा, औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण या पोलिस ठाण्यांत बनावट लग्नाचे गुन्हे नोंद आहेत. पैठणच्या गुन्ह्यात तिचा पती कचरुलाल तुळशीराम निलपत्रेवार हा देखील आरोपी आहे.    

टॅग्स :marriageलग्नfraudधोकेबाजी