ड्रायव्हरशी अफेअर, पतीचा काढला काटा, मग...; पत्नीचा कारनामा ऐकून पोलीस सुन्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2025 16:06 IST2025-03-18T16:05:18+5:302025-03-18T16:06:15+5:30
पतीच्या नातेवाईकांनी पत्नीचे एका रुग्णवाहिका चालकासोबत अफेअर सुरू असल्याचं पोलिसांना सांगितले

ड्रायव्हरशी अफेअर, पतीचा काढला काटा, मग...; पत्नीचा कारनामा ऐकून पोलीस सुन्न
उत्तर प्रदेशच्या आग्रा येथे पत्नीनेच पतीचा खून केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्रियकरासोबत मिळून पत्नीने पतीचा गळा दाबून खून केला. त्यानंतर मृतदेह ऑटोमध्ये ठेवून ६५ किमी अंतरावर मथुरा जिल्ह्यात फेकून दिला. या घटनेतील आरोपी पत्नीचे एका रुग्णवाहिका चालकासोबत अफेअर सुरू होते. त्याची भनक पतीला लागली तेव्हा त्याने याचा विरोध केला. त्यामुळे पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचा काटा काढायचा प्लॅन डोक्यात शिजवला.
पतीच्या हत्येनंतर संशय नको म्हणून पत्नीने दुसऱ्या दिवशी पोलीस ठाण्यात जाऊन तो बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली. ५ दिवसांपर्यंत पोलिसांनी कुठलाही सुगावा सापडला नाही. मृत पतीच्या नातेवाईकांनी पत्नीवर शंका घेतली. त्यानंतर पोलिसांनी पत्नीला ताब्यात घेत खाकीचा धाक दाखवून चौकशी केली. पत्नीची उडवाउडवीची उत्तरे ऐकून पोलिसांचाही संशय बळावला. त्यानंतर पोलिसांनी त्यांचा इंगा दाखवताच पत्नीने तिच्या कृत्याची कबुली दिली.
पत्नीने कबुल केला गुन्हा
आरोपी पत्नीने पोलिसांना सांगितले की, पतीला मला दररोज मारहाण करायचा त्यामुळे मी त्यांना मारून टाकले. त्यानंतर मृतदेह रिक्षातून मथुराच्या एका निर्जनस्थळी फेकून दिला. पत्नीचा जबाब ऐकून पोलीसही सुन्न झाले. मात्र ही हत्या महिला एकटी करू शकत नाही असं पोलिसांना वाटत होते. पतीच्या नातेवाईकांनी पत्नीचे एका रुग्णवाहिका चालकासोबत अफेअर सुरू असल्याचं पोलिसांना सांगितले. त्यानंतर पोलिसांनी त्यालाही ताब्यात घेतले. या खूनात त्याचाही सहभाग असल्याचं चौकशीत उघड झाले.
काय आहे प्रकरण?
मयत जितेंद्र बघेल यांचं दुकान होते. ११ मार्चला दुकान बंद करून ते घरी आले, त्यानंतर घरातून काही सामान आणण्यासाठी बाहेर पडले. त्यावेळी जितेंद्र कुणासोबत तरी फोनवर बोलत होते. रात्र झाली तरी जितेंद्र घरी आले नाहीत त्यामुळे पत्नी नीतूने १२ मार्चला पती बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांना दिली. पोलिसांचा शोध सुरू झाला. त्याचवेळी मथुरा जिल्ह्यातील हायवेशेजारी जितेंद्रचा मृतदेह आढळला. गावातील काही लोकांनी ही माहिती पोलिसांना दिली. मात्र जितेंद्रची हत्या झाल्याचं समोर आले. जितेंद्रच्या पत्नीने विष्णु बघेल आणि त्याचा मित्र अनिलसोबत मिळून रिक्षातून घेऊन गेले, वाटेतच गळा दाबून त्यांची हत्या केली. त्यानंतर मृतदेह निर्जनस्थळी फेकला. प्लॅनिंगनुसार हे सगळं करण्यात आले. हा प्रकार उघड होताच पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.