लग्नाच्या दोन वर्षानंतर पत्नीचे पांढरे केस पाहून भकडला पती आणि मग....

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 29, 2022 09:47 IST2022-11-29T09:46:21+5:302022-11-29T09:47:23+5:30

Crime News : सारण जिल्ह्यातील बबिता देवीचं लग्न दोन वर्षाआधी लौवा कला इथे राहणाऱ्या पंकज साहसोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती-पत्नीमध्ये वाद होत होते.

Wife white hair husband ruckus mandir second marriage police Saran Bihar | लग्नाच्या दोन वर्षानंतर पत्नीचे पांढरे केस पाहून भकडला पती आणि मग....

लग्नाच्या दोन वर्षानंतर पत्नीचे पांढरे केस पाहून भकडला पती आणि मग....

Crime News : बिहारच्या (Bihar) सारण जिल्ह्यातून एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यात एक विवाहित महिला मोठा गोंधळ घालताना दिसत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेचा पती गपचूप दुसरं लग्न करत होता. महिलेला याची माहिती मिळाली ती मंदिरात पोहोचली आणि तिने तिथे आरडाओरड सुरू केली. यावेळी दोन्ही परिवारांमध्येही वाद झाला. नंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि प्रकरण शांत केलं.

सारण जिल्ह्यातील बबिता देवीचं लग्न दोन वर्षाआधी लौवा कला इथे राहणाऱ्या पंकज साहसोबत झालं होतं. लग्नाच्या काही दिवसांनंतरच पती-पत्नीमध्ये वाद होत होते. पण घरातील वृद्ध लोकांनी दोघांमधील वाद मिटवला होता. पण लग्नाच्या दोन वर्षानी पंकजला पत्नीच्या डोक्यावर काही पांढरे केस दिसले तर त्याने घरात गोंधळ घातला.

पांढऱ्या केसावरून दोघांमध्ये सतत भांडणं होत होती. पीडितेने सांगितलं की, तिचा पती पांढऱ्या केसावरून टोमणे मारतो आणि कोणत्या ना कोणत्या प्रकारे त्रास देतो. ज्याची तक्रार बबिता देवीने पोलिसात केली. यानंतर पोलिसांनी दोघांमधील वाद मिटवला. रविवारी सायंकाळी पंकज गपचूप दुसरं लग्न करण्याची तयारी करत होता. स्थानिक लोकांनी याची माहिती बबिताला दिली आणि ती तिच्या वडिलांना घेऊन मंदिरात पोहोचली.

मंदिरात वाद वाढत असल्याचं पाहता पंकजसहीत सगळे लोक तिथून फरार झाले. बबिताने तिच्या सासरच्या लोकांवर आरोप लावला की, त्यांनी तिचा गर्भपात करण्यासाठी तिला रसगुल्ले आणि भातात औषध टाकून देण्याचाही प्रयत्न केला. जेव्हा तिने हे खाण्यास नकार दिला तेव्हा तिला मारहाण करण्यात आली. तसेच तिला माहेरी पाठवून दिलं. 

मग इथे तिचा पती आपल्या परिवाराला सोबत घेऊन गपचूप लग्न करत होता. जेव्हा शेजाऱ्यांनी महिलेला याची माहिती दिली तेव्हा ती पतीचं दुसरं लग्न रोखण्यासाठी मंदिरात पोहोचली. पोलीस पुढील चौकशी करत आहेत.

Web Title: Wife white hair husband ruckus mandir second marriage police Saran Bihar