पत्नीकडून अघोरी विद्येचा वापर, माझ्या खूनाचा कट रचला; उपजिल्हाधिकाऱ्याचा खळबळजनक आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2025 14:59 IST2025-03-31T14:59:16+5:302025-03-31T14:59:51+5:30

पत्नी, मेहुणा, सासू आणि दोन कामगार महिलांनी जातीवरून अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

Wife uses Aghori knowledge, plot to my murder; Sensational allegation by Deputy District Collector Devendra Katke | पत्नीकडून अघोरी विद्येचा वापर, माझ्या खूनाचा कट रचला; उपजिल्हाधिकाऱ्याचा खळबळजनक आरोप

पत्नीकडून अघोरी विद्येचा वापर, माझ्या खूनाचा कट रचला; उपजिल्हाधिकाऱ्याचा खळबळजनक आरोप

छत्रपती संभाजीनगर - जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक विभागाचे उपजिल्हाधिकारी देवेंद्र कटके यांनी पत्नी, सासू, मेहुण्यासह इतर ६ जणांविरोधात अ‍ॅट्रोसिटी, जादूटोणा कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. शहर पोलिसांनी पत्नी, मेहुणा आणि पत्नीच्या मित्राला अटक केली. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना ५ दिवसांची पोलीस कोठडी दिल्याची माहिती शहर पोलिसांनी दिली.

कटके यांनी सातारा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून विनोद उबाळे, पत्नी सारिका कटके, सासू सुवर्णा देशमुख, मेहुणा आतिश देशमुख, घरातील कामगार छायाबाई गायकवाड, शाळेतील कामगार संगीता यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीतील विनोद उबाळे, सारिका आणि आतिश यांना अटक करण्यात आले. फिर्यादीनुसार, देवेंद्र कटके आणि सारिका यांचा २००० साली आंतरजातीय विवाह झालेला आहे. कटके हे अनुसूचित जाती प्रवर्गातील असून सारिका या खुल्या प्रवर्गातील आहेत. विवाहानंतर काही दिवसानंतर पत्नीने पतीचे आई वडील घरी आल्यानंतर त्यांच्यासोबत अपमानास्पद वर्तन केले. तिला अनुसूचित जाती प्रवर्गाचे प्रमाणपत्र घेऊन अधिकारी व्हायचे होते मात्र तसे प्रमाणपत्र नसल्यामुळे तिचे पतीसोबतचे वर्तन बदलले होते.

त्यातूनच ती पतीचा जातीवरून अपमान करत होती. मात्र दोन्ही मुले मोठी झाल्यामुळे पतीने हा अपमान सहन केला. २०१५ मध्ये दिवाळीत मध्यरात्री ती कोणाशी तरी चॅटिंग करताना पतीला आढळली. पतीने पत्नीच्या आई आणि भावाला घडलेला प्रकार सांगितल्यानंतर प्रकरण मिटवले. २०१९ साली पती मुंबईत नोकरीला असताना पत्नी आणि एक मुलगा छत्रपती संभाजीनगरमध्येच ठेवला होता. २०२१ साली सारिकाने जालनातील बोरखडी येथे ग्रीनलँड स्कूल ही शाळा सुरू केली. त्याठिकाणीच मुख्य आरोपी विनोद उबाळे याचे हॉटेल होते. त्याच्यासह पत्नी, मेहुणा, सासू आणि दोन कामगार महिलांनी जातीवरून अपमानास्पद वागणूक दिली असा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.

अघोरी विद्येचा वापर, खून करण्याचा कट

पत्नीच्या मोबाईलमध्ये आक्षेपार्ह छायाचित्रे आणि रेकॉर्डिंग आढळून आल्याचे फिर्यादी कटके यांनी म्हटलं आहे. या रेकॉर्डिंगनुसार मुख्य आरोपी विनोद उबाळे हा अघोरी विद्येचा उपासक असून तो इतर आरोपींच्या संगनमताने माझ्यावर अघोरी विद्या वापरत असल्याचं समजले. या अघोरी विद्येमधून माझा खून करण्याचा कट असून त्या दृष्टीने जादूटोणा केल्याचेही फिर्यादीत म्हटलं आहे. 

Web Title: Wife uses Aghori knowledge, plot to my murder; Sensational allegation by Deputy District Collector Devendra Katke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.