गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरून हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2021 00:16 IST2021-01-30T00:16:27+5:302021-01-30T00:16:41+5:30

डोंबिवलीतील घटना : दोघांमध्ये झाले कडाक्याचे भांडण

Wife strangled for not coming to village; The husband surrendered himself to the police | गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरून हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन 

गावाला येत नसल्याने पत्नीची गळा चिरून हत्या; पती स्वत:हून पोलिसांच्या स्वाधीन 

डोंबिवली : गावाला यायला नकार दिला म्हणून झालेल्या वादात पत्नीची पतीने सुरीने गळा चिरून हत्या केल्याची घटना शेलार नाका परिसरात शुक्रवारी सकाळी घडली. ही माहिती स्वत:हून देत पती पोलिसांच्या स्वाधीन झाला.

शिवकुमार सरजू यादव असे आरोपी पतीचे नाव आहे. त्याचा कोळसे विक्रीचा व्यवसाय आहे. त्याला पत्नी मनीषा हिला गावाला घेऊन जायचे होते. परंतु तिने गावाला यायला नकार दिला. यावरून दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. या वादात घरातील सुरी घेऊन त्याने तिच्या गळ्यावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेल्या मनीषाचा जागीच मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे, ही घटना घडली तेव्हा त्यांचा लहान मुलगा सुदर्शन घरीच होता. दरम्यान, पत्नीचा खून केल्यानंतर शिवकुमारने स्वत:हून टिळकनगर पोलीस ठाण्यात फोन करून पत्नीची हत्या केल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिवकुमारला ताब्यात घेतले.

 

 

 

Web Title: Wife strangled for not coming to village; The husband surrendered himself to the police