The wife ran away with another man; the angry husband killed the woman by having sexual relations with them | बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

बायको परपुरुषासोबत पळून गेली; चिडलेला नवरा महिलांशी शारीरिक संबंध ठेवून करत असे हत्या

ठळक मुद्दे आरोपी रामुलू याचे वयाच्या २१व्या वर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती.

तेलंगणातील हैदराबादमध्ये पोलिसांनी सिरीयल किलरला अटक केली आहे. हा सिरीयल किलर अनेक महिलांशी शारिरीक संबंध ठेवल्यानंतर तो त्यांची हत्या करायचा. या आरोपीने आजतागायत १८ महिलांची हत्या केल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दोन महिलांच्या हत्येच्या आरोपाखाली अटक केल्यानंतर या सिरीयल किलरने आणखी १६ महिलांची हत्या केल्याची कबुली पोलीस चौकशीत दिली आहे.

पोलिसांनी आरोपीची केलेल्या चौकशीदरम्यान त्याने १८ हत्येची कबुली पोलिसांना दिली. आरोपीची बायको परपुरुषासोबत पळून गेली होती. तोच राग आणि चीड मनात त्याने ठेवली होती. त्यानंतर त्याने अनेक महिलांशी शारीरिक संबंध ठेऊन त्यांची हत्या केली. ३० डिसेंबर २०२० रोजी घाटकेसर येथील अंकुशपुरमध्ये वेंकटगिरी येथील ५० वर्षीय महिलेची हत्या झाली होती. पोलिसांनी या प्रकरणात बोरबंडा येथील ४५ वर्षीय रामुलू याला बेड्या ठोकल्या. या आरोपीविरोधात मूलगुणच्या बालगुमध्ये ३५ वर्षीय महिलेची हत्या केल्याचाही आरोप आहे. तिचा मृतदेह १० डिसेंबरला सिद्दीपेट येथे आढळून आला होता.


आरोपी रामुलू याचे वयाच्या २१व्या वर्षी लग्न झाले होते. त्याची पत्नी परपुरुषासोबत पळून गेली होती. त्यानंतर त्याच्या मनात महिलांबद्दल चीड निर्माण झाली. २००३ पासून त्याने महिलांना टार्गेट करण्यास सुरुवात केली. शारिरीक संबंधांसाठी तो महिलांना पैसे देऊन बोलवत असे. शारीरिक संबंध प्रस्थापित झाले की  त्यानंतर त्यांची हत्या करत असे. आतापर्यंत आरोपी रामुलू याने १८ महिलांना टार्गेट करून हत्या केली असल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. 

Web Title: The wife ran away with another man; the angry husband killed the woman by having sexual relations with them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.