भांडणानंतर माहेरी गेली पत्नी; पतीने रागातून गुप्तांगच कापले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2020 11:29 IST2020-01-02T11:29:10+5:302020-01-02T11:29:44+5:30

देवी हिला पतीपासून घटस्फोट हवा होता. यामुळे ती सोमवारी घर सोडून निघून गेली.

wife left after a quarrel; Husband cut off his genitals in anger | भांडणानंतर माहेरी गेली पत्नी; पतीने रागातून गुप्तांगच कापले

भांडणानंतर माहेरी गेली पत्नी; पतीने रागातून गुप्तांगच कापले

चेन्नई : पती-पत्नीतील वाद सर्वच घरांमध्ये होत असतात. माहेरी निघुन गेलेल्या पत्नीला मनविण्यासाठीही पती किंवा सासरची मंडळी जातात. पण चेन्नईमध्ये एक विचित्रच घटना घडली आहे. पत्नी भांडल्यानंतर माहेरी निघून गेल्याने पतीने रागातून गुप्तांगच कापल्याचा प्रकार घडला आहे. 


पोलिसांनी सांगितले की, चेन्नईच्या वॉशरमेनपट भागात हे दांपत्य राहते. बाबू (40) आणि देवी (35) असे पती पत्नीचे नाव आहे. दांम्पत्याला अद्याप अपत्य नाही. यामुळे त्यांच्यात नेहमी वाद होत होते. देवीला पती दारू पित असल्याचे आवडत नव्हते. 


पोलिसांनी सांगितले की, देवी हिला पतीपासून घटस्फोट हवा होता. यामुळे ती सोमवारी घर सोडून निघून गेली. मात्र, नवीन वर्ष साजरे करण्यासाठी ती मंगळवारी पुन्हा आली होती. यावेळी बाबूने दारू पिल्याने त्यांच्यात भांडणे झाली. यामुळे देवी पुन्हा माहेरी गेली. 


यामुळे नाराज झालेल्या पतीने किचनमधील चाकू घेतला आणि गुप्तांग कापले. यानंतर त्याच्या किंचाळ्या ऐकून शेजाऱ्यांनी धाव घेतली आणि हॉस्पिटलमध्ये भरती केले. यामुळे त्याची प्रकृती गंभीर बनली आहे.

Web Title: wife left after a quarrel; Husband cut off his genitals in anger