शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्वप्नांचा चुराडा अन् ३ महिन्यातच पतीची हत्या; जेवणानंतरची 'ती' एक सवय ठरली जीवघेणी, पत्नीचा प्रियकरासह रक्तरंजित खेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 11:22 IST

राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच राजस्थानातही एका नवविवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली.

Rajasthan Honeymoon Murder Case: राजस्थानच्या श्रीगंगानगर जिल्ह्यातून नात्यांना काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. इंदौरमधील गाजलेल्या राजा रघुवंशी हत्याकांडाप्रमाणेच राजस्थानातही एका नवविवाहितेने आपल्या प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केली. हा केवळ खून नसून, त्याला लुटमारीसह हिट अँड रनचे रूप देण्याचा प्रयत्न पत्नीने केला होताय मात्र पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या जोरावर या हनीमून मर्डरचा पर्दाफाश केला आहे.

३० जानेवारी २०२६ च्या रात्री ९ वाजेच्या सुमारास रावला पोलीस ठाण्याच्या हद्दीत आशीष आणि त्याची पत्नी अंजू हे दोघे रक्ताळलेल्या अवस्थेत रस्त्याच्या कडेला आढळले. आशीषला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. यावेळी पत्नी अंजूने पोलिसांना सांगितले की, एका अज्ञात वाहनाने आम्हाला धडक दिली आणि माझे सोन्याचे दागिने लुटून नेले."

अपघात की हत्या? पोलिसांना आला संशय

श्रीगंगानगरच्या पोलीस अधीक्षक डॉ. अमृता दुहन यांनी सांगितले की, सुरुवातीपासूनच अंजूच्या वागण्यावर पोलिसांना संशय होता. अपघातात पतीचा मृत्यू झाला असताना, शेजारीच असलेल्या पत्नीला साधे खरचटलेही नव्हते. तसेच, मेडिकल रिपोर्टमध्ये आशीषच्या शरीरावर मारहाणीच्या खुणा आणि गळा आवळल्याच्या खुणा स्पष्टपणे दिसत होत्या. फॉरेन्सिक टीमच्या तपासणीत हा अपघात नसल्याचे सिद्ध झाले.

अंजू आणि संजूची जुनी प्रेमकाहानी

तपासात, २३ वर्षीय अंजूचे लग्नापूर्वी सादुलशहर येथील संजू नावाच्या मुलाशी प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. ३ महिन्यांपूर्वी तिचे लग्न आशीषशी झाले. आशीष आपल्या सुंदर पत्नीसोबत भविष्याची स्वप्ने पाहत होता, पण अंजूला आशीषसोबत राहणे मान्य नव्हते. तिने आपल्या माहेरी गेल्यावर संजू आणि त्याच्या दोन साथीदारांसोबत मिळून आशीषला कायमचे संपवण्याचा कट रचला.

जेवणानंतरची सवय अन् मफलरने आवळला गळा

अंजूला ठाऊक होते की आशीष रोज रात्री जेवणानंतर चालायला जातो. आशीषचा संशय येऊ नये म्हणून अंजू गेल्या काही दिवसांपासून त्याच्यासोबत फिरायला जाऊ लागली होती. ३१ जानेवारीच्या रात्री अंजू आशीषला मुद्दाम एका निर्जन रस्त्यावर घेऊन गेली. तिथे आधीच झुडपात लपून बसलेला संजू आणि त्याचे साथीदार रॉकी व बादल यांनी आशीषवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला केला. आशीष बेशुद्ध पडल्यावर खात्री करण्यासाठी त्यांनी मफलरने त्याचा गळा आवळला. हा गुन्हा लूटमारीचा वाटावा म्हणून अंजूने स्वतःचे झुमके आणि आशीषचा मोबाईल संजूकडे सोपवला.

चारही आरोपी गजाआड

पोलिसांनी तांत्रिक पुरावे आणि मोबाईल कॉल रेकॉर्ड्सच्या आधारे मुख्य आरोपी पत्नी अंजू, तिचा प्रियकर संजू, रोहित उर्फ रॉकी आणि सिद्धार्थ उर्फ बादल या चौघांनाही अटक केली आहे. सुरुवातीला अंजू वारंवार आपला जबाब बदलत होती, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच तिने आपला गुन्हा कबूल केला.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Wife, lover conspire to murder husband after honeymoon in Rajasthan.

Web Summary : In Rajasthan, a newlywed conspired with her lover to murder her husband. She feigned a robbery and hit-and-run, but police investigation revealed the truth. The wife and her lover, along with two accomplices, have been arrested.
टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थानPoliceपोलिस