शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याण लोकसभा मतदारसंघात एकनाथ शिंदेंकडून काँग्रेसला धक्का, बड्या नेत्यासह माजी नगसेवक शिंदे गटात 
2
Blog : ऋतुराज गायकवाड T20 WC मध्ये का नको? डावा-उजवा असा खेळ बस्स करा...
3
भाजपा खासदार व्ही. श्रीनिवास प्रसाद यांचं निधन, चार दिवसांपासून ICUमध्ये घेत होते उपचार  
4
अमित शाहांच्या बनावट व्हिडीओप्रकरणी एफआयआर दाखल; तेलंगणा काँग्रेसकडून व्हिडीओ शेअर
5
"अजून मी प्रचारालाही सुरुवात केली नाही, तोवर...; उज्ज्वल निकमांचा विरोधकांना टोला
6
पिकअप व्हॅन आणि कारचा भीषण अपघात, १० जणांचा मृत्यू, २३ जण जखमी   
7
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
8
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
9
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
10
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
11
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
12
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
13
एक-एक वर्षासाठी पंतप्रधानपदाचे वाटप ; ‘इंडिया’चे हेच समीकरण : पंतप्रधान मोदी
14
भाजप अन् बीजेडीची ओडिशात मिलीभगत; निवडक लोकांसाठी काम : राहुल गांधी
15
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
16
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
17
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
18
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
19
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
20
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर

तिने प्रियकराच्या साथीने पतीला ठार मारलं, मुलीने सगळं पाहिलं!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2019 9:41 AM

पतीची हत्या झाल्याचा महिलेचा बनाव

नवी दिल्ली: पत्नीनं प्रियकराच्या मदतीनं पतीची हत्या केल्याचा प्रकार नवी दिल्लीत घडला. धक्कादायक बाब म्हणजे महिलेनं तिच्या मुलीसमोरच पतीची हत्या घडवून आणली. नवी दिल्लीतील समयपूर बदली परिसरात हा प्रकार घडला. पोलिसांनी महिलेचे कॉल रेकॉर्ड तपासल्यानंतर या घटनेचं गूढ उलगडलं.पती सोनूची हत्या झाल्याचा बनाव रचत महिलेनं खुन्याला लवकरात लवकर अटक करण्याची मागणी पोलिसांकडे केली. मात्र संशय आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासले. त्यातून अतिशय महत्त्वपूर्ण माहिती समोर आली. पतीच्या हत्येचा दावा करणारी महिला तिचा शेजारी सागरच्या सतत संपर्कात होती. विशेष म्हणजे सोनूची हत्या झाल्याची तक्रारदेखील त्याच्या भावानं नोंदवली होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.सोनू पत्नी आणि मुलीसह मध्यरात्री झोपायला गेल्याची माहिती पोलिसांना तपासादरम्यान मिळाली. मात्र पतीची हत्या होत असताना आपल्याला कोणताही आवाज ऐकू न आल्याचा दावा पत्नीनं केला. कोणीतरी येऊन पतीची हत्या करुन गेलं, असं महिलेनं पोलिसांना सांगितलं. महिलेच्या दाव्याबद्दल पोलिसांना शंका आल्यानं पोलिसांनी तिचे कॉल रेकॉर्ड तपासून पाहिले. त्यामधून महिला शेजारी राहणाऱ्या सागर नावाच्या तरुणाच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. कॉल रेकॉर्ड तपासून पाहिल्यानंतर पोलिसांनी सागरची चौकशी केली. त्यावेळी त्यानं खुनाची कबुली दिली. सोनूच्या पत्नीच्या मदतीनं हत्या केल्याचं त्यानं पोलिसांना सांगितलं. सागर आणि सोनूच्या पत्नीचे प्रेमसंबंध होते. काही दिवसातच ते दोघे पळून जाणार होते. त्यामुळेच सोनू झोपल्यानंतर महिलेनं सागरला घरी बोलावलं आणि नायलॉनच्या दोरीनं गळा आवळून त्याची हत्या केली. यानंतर महिला रात्रभर सोनूच्या मृतदेहाजवळ बसून होती. सकाळी 7 च्या सुमारास तिनं पतीची हत्या झाल्याचं म्हणत आरडाओरडा सुरू केला. मात्र कॉल रेकॉर्ड तपासल्यानं या प्रकरणाचा उलगडा झाला. 

टॅग्स :Murderखून