शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

भयंकर! लग्नाच्या 38 वर्षांनंतर 'तिने' केली पतीची हत्या; साखरेचा उकळता पाक अंगावर फेकून जीव घेतला अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 14:06 IST

Crime News : एका महिलेने आपल्या पतीवर साखरेचा उकळता पाक फेकून त्याची हत्या केली आहे.

जगभरात कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वच देश कोरोनाच्या महाभयंकर संकटाचा सामना करत आहेत. याच दरम्यान अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशीच एक भयंकर घटना ब्रिटनमध्ये घडली आहे. एका महिलेने आपल्या पतीवर साखरेचा उकळता पाक फेकून त्याची हत्या केली आहे. पती आपल्याचं मुलांचं लैंगिक शोषण करत असल्याचा महिलेला संशय होता. त्यातून तिने पतीची हत्या केल्याची माहिती मिळत आहे. पती झोपलेला असताना महिलेने साखरेचा उकळता पाक त्याच्या अंगावर ओतला. जळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. आता या प्रकरणात महिलेला आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

रिपोर्टनुसार, आरोपी महिलेचं नाव कोरिन्ना स्मिथ असून तिचं वय 59 वर्षे आहे. तिने गेल्या वर्षी 14 जुलै रोजी घरी झोपलेल्या अवस्थेत 80 वर्षीय पती मायकल बेन्स याची हत्या केली आहे. ही महिला गेल्या 38 वर्षांपासून पतीसोबत राहत होती. मात्र मुलांबाबत ऐकल्यानंतर तिचा राग अनावर झाला व तिने साखरेचं उकळतं पाणी पतीवर ओतून त्याची हत्या केली. या घटनेनंतर शेजारच्यांच्या मदतीने बेन्सला रुग्णालयात नेण्यात आलं. रुग्णालयात दाखल झाल्याच्या 5 आठवड्यांनंतर त्याचा मृत्यू झाला. ज्यानंतर पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेतलं. एक वर्षे सुरू असलेल्या सुनावणीनंतर महिलेला दोषी मानत हत्येच्या गुन्ह्याखाली 12 वर्षांसाठी आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. 

लिव्हरपूल इकोनुसार, तिने सुनावणीदरम्यान कोर्टात सांगितलं की, हल्ल्याच्या एक दिवसापूर्वी पतीबाबत सुरू असलेल्या अफवेमुळे महिला रागात होती. महिलेला तिच्या मुलीने सांगितलं की, मायकल बेन्स गेल्या अनेक वर्षांपासून आमचं लैंगिक शोषण करीत होते. घटनेच्या दिवशी महिला रागात होती आणि पतीला मारण्यासाठी तिने बादलीभर पाणी आणि साखर मिसळून गरम केलं. जेव्हा महिलेचा पती झोपण्यासाठी गेला तेव्हा महिलेने बादलीने उकळता साखरेचा पाक त्याच्या अंगावर ओतला. पतीच्या ओरडण्याचा आवाज ऐकून महिला घर सोडून शेजारी पळाली. आणि आपणं केलेल्या कृत्याबाबत सांगितलं, घटनेची माहिती मिळताच पोलीस घरी दाखल झाली व जखमी मायकलला रुग्णालयात दाखल केलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

संतापजनक! तरुणाला 'जात' विचारत बेदम मारहाण, गुप्तांगावरही केला हल्ला; घटनेने खळबळ

उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली आहे. एक तरुणाला तुझी जात कोणती हा प्रश्न विचारत बेदम मारहाण करण्यात आली आहे. भयंकर बाब म्हणजे तरुणाच्या गुप्तांगावर देखील हल्ला करण्यात आला आहे. सोशल मीडियावर य़ा घटनेचा एक व्हिडीओ जोरदार व्हायरल झाला आहे. यामध्ये तरुणाला लोकांनी लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून संतापाची लाट निर्माण झाली आहे. बेदम मारहाणीत तरुणाला गंभीर दुखापत झाली आहे. उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. धक्कादायक घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलिसांनी गुन्हा दाखल करून एका आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. आरोपी तरुणाला त्याची जात विचारत आहेत. यानंतर आरोपींनी तरुणाला बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली हे व्हिडीओमध्ये स्पष्टपणे दिसत आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यू