घरगुती वादातून पत्नीची हत्या, पोलिसांनी केली पतीला अटक
By मुरलीधर भवार | Updated: November 25, 2022 16:32 IST2022-11-25T16:32:19+5:302022-11-25T16:32:41+5:30
कल्याण नजीक टिटवाळ्य़ात आपटी परिसरात बिंदूसरा फार्म हाऊस आहे.

घरगुती वादातून पत्नीची हत्या, पोलिसांनी केली पतीला अटक
कल्याण - पतीने घरगुती वादातून पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना टिटवाळ्यात घडली आहे. या प्रकरणी आरोपी पती युवक बाळू दुटे याला अटक करण्यात आली आहे.
कल्याण नजीक टिटवाळ्य़ात आपटी परिसरात बिंदूसरा फार्म हाऊस आहे. या फार्म हाऊसवर युवक दुटे हा कामाला आहे. तो त्याच्या पत्नीसोबत राहत होता. युवक याला दारुचे व्यसन होते. त्यावरुन दोघा पती पत्नीमध्ये सातत्याने भांडण होत होते. 23 नोव्हेंबरच्या रात्री आठ ते 9 वाजताच्या सुमारास पती युवक आणि पत्नी उषा यांच्यात जोरदार वाद झाला.
या वादात युवकने कुऱ्हाडीने प्रहार करुन पत्नी उषाचे डोके फोडले. उषा ही जागीच ठार झाली. या प्रकरणी उषा हिचा भाऊ दत्तू परते याने टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानंतर टिटवाळा पोलिसांनी उषाच्या हत्ये प्रकरणी युवकला अटक केली. कल्याण न्यायालयात युवकला हजर केले असता न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे.