Wife has killed husband due to extra marital affair | विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केली पतीची चाकू भोसकून हत्या

विवाहबाह्य संबंधातून पत्नीने केली पतीची चाकू भोसकून हत्या

ठळक मुद्देपत्नीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिला अटक केले आहे. तपासात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले

नालासोपारा - नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरातील एका इमारतीमध्ये ३६ वर्षीय पतीची दुसऱ्या महिलेसोबत असलेल्या विवाहबाह्य संबंधामुळे पत्नीने चाकूच्या साहयाने हत्या केल्याने एकच खळबळ माजली आहे. विशेष म्हणजे बंद घरात आई, वडील, आजी, बायको व दोन्ही मुली घरात झोपलेले असताना ही हत्या झाली आहे. यामुळे पोलिसांना प्रश्न पडला होता. पोलिसांनी घरातील सर्वांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती. शेवटी पत्नीने हत्या केल्याचा गुन्हा कबूल केल्यावर पोलिसांनी तिला अटक केले आहे. मृत पतीचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन शवविच्छेदनसाठी पाठवला होता.

नालासोपारा पूर्वेकडील गाला नगर परिसरातील ओम तुलसी अपार्टमेंटमधील सदनिका नंबर सी/02 मध्ये सुनील आनंदा कदम (३६) याचे त्याच्याच कंपनीमध्ये कामाला असलेल्या प्रणाली (३४) सोबत प्रेमप्रकरण असल्याने घरच्यांना सांगून घरच्यांनी २०११ मध्ये दोघांचे लग्न लावून दिले होते. लग्न झाल्यानंतर सहा व एक वर्षाच्या दोन मुली, आई, वडील आणि आजी या परिवारासोबत ते राहत होते. मंगळवारी रात्रीच्या वेळी दोघा पती पत्नीचे कोणत्या कारणावरून वाद झाल्याचे सूत्रांकडून कळते. बुधवारी पहाटे साडे पाचच्या सुमारास सुनील याच्या मानेवर, छातीवर आणि पोटाच्या डाव्या बाजूला धारदार चाकूने वार केल्याने अतिरक्तस्त्राव झाल्याने मृत्यू झालेला मृतदेह घरच्यांनी पाहिला. पत्नी प्रणाली हिने तुळींज पोलीस ठाण्यात जाऊन घटनेची माहिती देऊन पतीने आत्महत्या केल्याचा बनाव आखला. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनसाठी हॉस्पिटलमध्ये पाठवला, मात्र,  संशय आल्याने पोलिसांनी घरातील सर्वांना चौकशी करिता ताब्यात घेतले. सुनील याच्या वडिलांनी तुळींज ठाण्यात तक्रार दिल्यावर पोलिसांनी हत्येचा आणि हत्येचा पुरावा नष्ट केला म्हणून गुन्हा दाखल केला आहे. तपासात पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवल्यावर पत्नीने हत्या केल्याचे कबूल केले तसेच पतीचे दुसऱ्या महिलेशी अनैतिक संबंध असल्यामूळे हत्या केल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रेय पाटील यांनी लोकमतला बोलतात सांगितले आहे. 

Web Title: Wife has killed husband due to extra marital affair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.