धक्कादायक! पती रात्री उशारापर्यंत टीव्ही बघत होता म्हणून पत्नीने केली आत्महत्या!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2021 16:40 IST2021-03-20T16:39:25+5:302021-03-20T16:40:00+5:30
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आम्ही केस दाखल केली आहे.

धक्कादायक! पती रात्री उशारापर्यंत टीव्ही बघत होता म्हणून पत्नीने केली आत्महत्या!
मध्य प्रदेशच्या इंदुरमध्ये आत्महत्येची एक हैराण करणारी एक घटना समोर आली आहे. इथे एका महिलेने आत्महत्या केली कारण तिचा पती रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत होता आणि टीव्ही बंद करायला तयार नव्हता. या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
टीव्ही बंद केला नाही म्हणून गळफास
ही घटना इंदुरच्या लसूडिया परिसरातील आहे. इथे २३ वर्षीय महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केली. पोलिसांनुसार, महिला सोनूचा पती अर्जुन माराठा रात्री उशीरापर्यंत टीव्ही बघत होता. महिलेने पतीला टीव्ही बंद करण्यास सांगितले. पण त्याने टीव्ही बंद केला नाही. यानंतर महिला नाराज होऊन दुसऱ्या रूममध्ये गेली.
काय झालं त्या रात्री?
रात्री साधारण ३ वाजता जेव्हा पती झोपेतून जागा झाला तेव्हा त्याला दिसलं की, पत्नी फासावर लटकलेली आहे. हे बघताच पतीच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने कसातरी पत्नीचा मृतदेह खाली उतरवला आणि तिला घेऊन हॉस्पिटलला गेला. पण ती वाचू शकली नाही.
पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, शुक्रवारी रात्री हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. आम्ही केस दाखल केली आहे. पोलीस पतीच्या जबाबानंतर पुढील कारवाई करतील. आम्ही हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहोत की, ही आत्महत्या आहे की अजून काही.