पतीचं चॅटिंग पाहताच पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली; नको ते सत्य उघडकीस आलं
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2025 22:11 IST2025-01-06T22:05:50+5:302025-01-06T22:11:26+5:30
त्रासाला कंटाळून महिला पाेलिसाची तक्रार, पीडितेने तक्रारीत केले गंभीर आराेप

पतीचं चॅटिंग पाहताच पत्नीच्या पायाखालची वाळू सरकली; नको ते सत्य उघडकीस आलं
आशिष गावंडे
अकोला - पतीसह सासरकडील मंडळीकडून मानसिक व शारिरीक छळ हाेत असल्याचे नमुद करतानाच महिला पाेलिस कर्मचाऱ्याने तीचा पती समलैंगिक असल्याचा धक्कादायक आराेप तक्रारीत केला आहे. याप्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरुन पतीसह सासरकडील पाच जणांविराेधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महिला पाेलिसाने केलेल्या गंभीर आराेपांमुळे पाेलिस खात्यात खळबळ उडाली आहे.
जिल्हा पाेलिस दलात कार्यरत एका ३५ वर्षीय महिलेचे २०२२ मध्ये लग्न झाले. विवाहानंतर काही दिवस पतीसह सासरकडील मंडळींनी तीच्यासाेबत चांगला व्यवहार केला. ही बाब पाहून पत्नीच्या नात्याने या महिलेने सासरकडील घराच्या दुरुस्तीसाठी एक लाख व शेतीवरील दाेन लाख रुपयांचे कर्ज अदा केले. काही दिवसांतच पाेलिस विभागातील ड्यूटीच्या कारणावरुन व घरातील कामकाजाच्या मुद्यावरुन विवाहितेला मानसिक त्रास सुरु झाला. यात भरीस भर पतीनेही त्याचा खरा चेहरा उघड करीत पैशांसाठी लग्न केल्याचे त्याने पीडित विवाहितेला सांगितले. हे ऐकताच पीडितेला माेठा मानसिक धक्का बसला. इथपर्यंत न थांबता, कुटुंबियांकडून पीडितेच्या चारित्र्यावर संशय व्यक्त केला जाऊ लागला. या प्रकारामुळे मानसिकरित्या त्रस्त झालेली पीडिता आई, वडिलांसह शहरातील एका शासकीय निवासात राहू लागली. यानंतरही पती व सासरकडील सदस्यांकडून तीचा मानसिक छळ केला जाऊ लागला. यामुळे वैतागलेल्या पिडीतेने पाेलिसात तक्रार देण्याचा निर्णय घेतला. पाेलिसांनी प्राप्त तक्रारीवरुन पतीसहीत पाच जणांविराेधात भारतीय न्याय संहितेच्या ३९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ नुसार गुन्हा दाखल केला.
असा झाला भंडाफाेड
एक दिवस आराेपी पतीने त्याचा मोबाइल चर्जिंगला लावला हाेता. त्यावेळी पीडितेने त्याचा माेबाइल तपासला असता, व्हाटसएपवरील मेसेज वाचून तीच्या पायाखालची जमिन सरकली. पतीचे काही इतर पुरुषांसाेबत नियमीत शारिरीक संबंध असल्याचे समाेर आले. पती घरी आल्यावर पीडितेने याविषयी जाब विचारला असता, सुरुवातीला पतीने काही बाेलण्यास टाळाटाळ केली. पंरतु पीडितेने व्हाटसअँप चॅट वाचून दाखवल्यावर पतीने लग्नापूर्वीपासूनच समलैंगिक असल्याची बाब कबुल केेली. पीडितेच्या तक्रारीत ही बाब नमुद करण्यात आली आहे.