पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

By नितीन जगताप | Updated: June 3, 2021 21:35 IST2021-06-03T21:34:31+5:302021-06-03T21:35:55+5:30

The wife exposed her husband's misconduct : याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू  केला आहे.

The wife exposed her husband's misconduct; Bogus voting cards found in high profile society | पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

पत्नीनेच केला पतीच्या गैरकृत्याचा पर्दाफाश; हायप्रोफाईल सोसायटीत सापडले बोगस वोटिंग कार्ड  

ठळक मुद्देकृतिका आणि कामेश यांच्यात वाद सुरू असून कृतिकाने काही महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये कामेश यांच्या विरोधात तक्रारही दिली होती

कल्याण पश्चिमेकडील खडकपाडा परिसरातील माधव-संसार या हाय प्रोफाईल सोसायटीमधील एका फ्लॅटमध्ये भारत निवडणूक आयोगाकडून मिळणा-या निवडणूक मतदार ओळखपत्रासारखे साडेचारशे ते पाचशे बनावट कोरी निवडणूक ओळखपत्रे सापडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कामेश मोरे नावाच्या व्यक्तीविरोधात खडकपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू  केला आहे.  कामेश मोरेच्या पत्नीनेच हा सर्व प्रकार उघडकीस आणला आहे हे विशेष.


कामेश यांनी 26 मे रोजी मुलगा कौस्तुभला निवडणूक ओळखपत्र बाहेर काढून ठेव. मी घ्यायला येतो अस सांगितलं. त्यानुसार  मुलाने ती काढली. मात्र ती ओळखपत्र बनावट कोरी होते. हे पाहताच त्यांची पत्नी कृतिका हैराण झाली. तीने याची माहीती स्थानिकांना दिली. स्थानिकांनी याबाबत तहसिलदार दिपक आकडे यांना माहिती दिली. आकडे यांनी निवडणुक विभागाच्या नायब तहसिलदार वर्षा थळकर यांना सांगितल्यावर थळकर यांनी आपल्या पथकासह घटनास्थळी धाव घेतली. त्याठिकाणी तपासणी केली असता तीन बॉक्समध्ये निवडणूक मतदार ओळखपत्रसारखे बनावट कोरी निवडणूक ओळखपत्र आढळून आली.



दरम्यान कृतिका आणि कामेश यांच्यात वाद सुरू असून कृतिकाने काही महिन्यांपूर्वी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये कामेश यांच्या विरोधात तक्रारही दिली होती. न्यायालयाने जामिन मंजूर करताना घरात जायचे नाही तीला त्रस दयायचा असे त्याला सांगितल्याने तो कृतिका सोबत राहत नाही  अशी माहिती पोलिसांनी दिलीय.  दरम्यान याबाबत खडकपाडा पोलीस  ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला  असून पोलीस अधिक तपास करत असल्याचं तहसीलदार दीपक आकडे यांनी "लोकमतशी" बोलताना सांगितलं. कोरोनामुळे केडीएमसीची निवडणूक लांबणीवर पडली आहे. परंतू या निवडणूकीच्या तोंडावर कोरी मतदार ओळखपत्रे कशासाठी आणली होती. त्याचा वापर कशासाठी केला जाणार होता? असे एक ना अनेक सवाल उपस्थित झाला आहे.

Web Title: The wife exposed her husband's misconduct; Bogus voting cards found in high profile society

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.