माहेरी येऊन करायचा हाणामारी, संतप्त पत्नीने चाकूने कापले पतीचे लिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2019 06:25 PM2019-09-20T18:25:23+5:302019-09-20T18:26:53+5:30

पत्नीनं रागाच्या भरात तिच्या पतीचं गुप्तांग छाटल्याची खळबळजनक घटना घडली

wife cuts off husband genital in andhra pradesh | माहेरी येऊन करायचा हाणामारी, संतप्त पत्नीने चाकूने कापले पतीचे लिंग

माहेरी येऊन करायचा हाणामारी, संतप्त पत्नीने चाकूने कापले पतीचे लिंग

Next
ठळक मुद्दे युनूस (23) असं या तरुणाचं नाव असून हसीना असं त्याच्या पत्नीचे नाव आहे.जखमी झालेल्या युनूसला नंदयाल जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

आंध्र प्रदेश - सासरी जाऊन सासरच्या माणसांशी आणि पत्नीशी भांडायचं म्हणून पत्नीनं रागाच्या भरात तिच्या पतीचं गुप्तांग छाटल्याची खळबळजनक घटना घडली आहे. युनूस (23) असं या तरुणाचं नाव असून हसीना असं त्याच्या पत्नीचे नाव आहे.

जनसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, आंध्र प्रदेशमधील करनूल जिल्ह्यात ही खळबळजनक घटना घडली आहे. युनूस आणि हसीना यांचा विवाह दोन वर्षांपूर्वी झाला होता. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला संसार सुरळीत सूर होता. काही काळाने त्यांच्यात भांडणं होऊ लागली. नेहमीच्या भांडणांना वैतागून हसीना माहेरी निघून गेली आणि सासरी परत आलीच नाही. दोन दिवसांपूर्वी युनूस तिच्या माहेरी गेला आणि त्याने हसीनाच्या वडिलांना तिला पुन्हा सासरी नेण्याबाबत सुनावलं. मात्र, मुलीला होणार त्रास लक्षात घेता तिच्या वडिलांनी नकार दिला. हळूहळू त्यांच्या किरकोळ वादाचं पर्यवसन कडाक्याच्या भांडणात झालं. रागाच्या भरात युनूस हसीनाच्या वडिलांना मारहाण करायला गेला आणि हसीना वडिलांना वाचविण्यासाठी भांडणात मध्ये पडली. तिने युनूसच्या डोळ्यात मिरचीपूड फेकली. डोळे झोंबल्याने युनूस मागे झाला आणि डोळे चोळू लागला. मात्र, संतापलेली हसीना स्वयंपाकघरातला चाकू आणला आणि युनूसवर हल्ला करून त्याचं गुप्तांग कापलं. जखमी झालेल्या युनूसला नंदयाल जनरल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया करून गुप्तांग परत जोडण्यासाठी डॉक्टर प्रयत्न करत आहेत. 

Web Title: wife cuts off husband genital in andhra pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.