दारूड्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा; राग अनावर झाल्याने केली होती हत्या

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 04:38 PM2019-08-31T16:38:50+5:302019-08-31T16:39:05+5:30

2015 तील फोंड्यातील घटना,  राग अनावर झाल्याने दांड्याने मारहाण केली होती.

Wife convicted of murdering drunk husband; The murder was caused by anger | दारूड्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा; राग अनावर झाल्याने केली होती हत्या

दारूड्या पतीचा खून करणाऱ्या पत्नीला जन्मठेपेची शिक्षा; राग अनावर झाल्याने केली होती हत्या

Next

मडगाव: सतत  दारु पीत असलेल्या आपल्या पतीच्या जाचाला कंटाळून  त्याला मारहाण करुन त्याचा खून करण्याचा आरोप असलेल्या पत्नीला जन्पेठ झाली आहे.  वारखंडे - फोंडा येथील अनिता भोमकर या महिलेला  फोंड्याच्या अतिरिक्त सत्र न्यायाधीश बेला नायक  यांनी  दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याशिवाय तिला एक हजार रुपयांचा दंड फर्मावला असून  हा दंड न भरल्यास  दोन वर्षाची अतिरिक्त शिक्षा तिला भोगावी लागणार आहे.

या घटनेची पार्श्वभूमी अशी,  अनिता हिचा पती निलेश भोमकर (31) याला दारुचे व्यसन होते.  तो सतत दारुच्या नशेत राहत असल्यामुळे पती पत्नीत  भांडणोही होत असतं. 27 ऑक्टोबर 2015 रोजी निलेश असाच घरातून गायब झाल्याने पत्नी अमिता त्याला शोधत आली असता  दुपारी दीडच्या सुमारास माशेल येथील रेखा शॉप्स इमारतीच्या वरच्या मजल्यावर तो झोपलेला तिला सापडला. दारुच्या नशेत आपला  पती घोरत पडला आहे हे पाहिल्यावर तिच्या तळपायाची आग मस्तकाला भिडली त्याच रागाच्या भरात तिने जवळ असलेला लाकडाचा दांडा घेऊन त्याच्या डोक्यावर हाणल्याने जबर जखमी अवस्थेत त्याला इस्पितळात नेत असताना वाटेत त्याचे निधन झाले होते.

आरोपीला नवऱ्याचा एवढा राग आला होता की तिने लागोपाठ सात आठ दांडे नवऱ्यावर हाणले. शवचिकित्सा अहवालात मृताच्या अंगावर एकूण आठ जखमा सापडल्या होत्या.  ही मारहाण करुन आरोपी अनिता खाली आल्यावर तिने खालच्या बार मालकालाही आपण पतीला जिवंत मारुन खाली आली आहे असे सांगितले होते. जखमी अवस्थेत निलेशला इस्पितळात नेत असतानाही त्यानेही आपल्याला पत्नीकडून मारहाण झाल्याचे सांगितले होते.

सरकारी वकील सत्यवान राऊत देसाई यांनी  हा सगळा पुरावा न्यायालयासमोर आणून  आरोपीचा गुन्हा सिध्द केला. फोंड्याचे तत्कालीन पोलीस निरिक्षक सुदेश नाईक यांनी या प्रकरणाचा  तपास लावला होता. आरोपीला दोषी ठरविल्यानंतर आरोपीचे वय अवघे 28 वर्षाचे आहे आणि तिला एक लहान मुलगी आहे. त्या मुलीचा सांभाळ करण्यासाठी कोणी नसल्याने न्यायालयाने शिक्षा देताना दया दाखवावी अशी मागणी तिच्या वकिलानी न्यायालयात केली होती. 
 

Web Title: Wife convicted of murdering drunk husband; The murder was caused by anger

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.