खूप झालं, आता सहन होत नाही; पत्नीचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर थोड्याच वेळात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 12:19 IST2023-04-05T12:18:26+5:302023-04-05T12:19:47+5:30

गेल्या काही महिन्यांपासून सोनम आणि धर्मवीर यांच्यात वाद सुरू होता. सोनम खूप दिवस माहेरी गेली होती.

Wife commits suicide due to husband-wife dispute, incident in Ghaziabad | खूप झालं, आता सहन होत नाही; पत्नीचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर थोड्याच वेळात...

खूप झालं, आता सहन होत नाही; पत्नीचा पतीला अखेरचा कॉल; त्यानंतर थोड्याच वेळात...

गाझियाबाद - शहरातील आदर्श कॉलनी परिसरात एका महिलेने पतीला कॉल केला त्यानंतर काही वेळात गळफास घेत आत्महत्या केली. तुम्ही ड्यूटीवरून परतल्यानंतर तोंड बघायला मिळणार नाही असं पत्नीने पतीला सांगितले. रागाच्या भरात पत्नी बोलली असेल हे समजून पतीने दुर्लक्ष केले. परंतु थोड्याच वेळात पत्नीने गळफास घेतल्याची बातमी पतीच्या कानावर धडकते आणि त्याला धक्काच बसतो. 

महिलेच्या मृतदेहाशेजारी कुठलीही सुसाईड नोट आढळली नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहे. तर महिलेच्या कुटुंबीयांनी सासरच्यांवर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे. इटावा येथे राहणाऱ्या २४ वर्षीय सोनमचं फेब्रुवारी २०२२ रोजी बिहारीपुराच्या आदर्श कॉलनीत राहणाऱ्या धर्मवीरसोबत प्रेमविवाह झाला होता. या दोघांचे लग्न कुटुंबाच्या मर्जीने झाले होते. धर्मवीर गाझियाबादच्या एका कारखान्यात कामाला होता. 

पोलिसांच्या माहितीनुसार, गेल्या काही महिन्यांपासून सोनम आणि धर्मवीर यांच्यात वाद सुरू होता. सोनम खूप दिवस माहेरी गेली होती. त्यानंतर रविवारी ती सासरी परतली. दुपारी तिने पती धर्मवीरला फोन केला. तेव्हा फोनवरून दोघांमध्ये वाद झाला. सोनमने जीव देण्याची भाषा केली तेव्हा धर्मवीरने तिला समजावलं. त्यानंतर दुपारी सोनमनं पंख्याला लटकून गळफास घेतला. धर्मवीरच्या भावाने तिचा लटकलेला मृतदेह पाहून तात्काळ पोलीस आणि भावाला कळवले. पोलीस आणि नातेवाईकांनी मिळून तिचा मृतदेह खाली उतरवला. प्राथमिकदृष्ट्या पती-पत्नीच्या वादातून तिने आत्महत्या केल्याचं समोर येत आहे. सोनमच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. 

तुम्ही ड्यूटीवरून परतल्यानंतर...
ऐका, खूप झालं, आता सहन होत नाही...तुम्हाला आज ड्युटीवरून परतल्यानंतर माझं तोंड बघायला मिळणार नाही इतके पत्नी सोनमनं फोनवर सांगितले. सोनमच्या या धमकीनं धर्मवीर घाबरला. दोघांमध्ये नेहमी वाद होत होता. पत्नी रागाच्या भरात बोलली असेल असं त्याला वाटले. परंतु हा पत्नीचा अखेरचा कॉल असेल आणि ती असं काही करेल याची कल्पनाही पतीला नव्हती. 

थोड्याच वेळात पतीच्या मोबाईलवर दुसरा कॉल आला. यावेळी खूप वाईट बातमी आली. तू पटकन घरी ये, तुझ्या बायकोने गळफास घेत आत्महत्या केलीय. पोलीस आले आहेत, तुला बोलावत आहे. हे ऐकून धर्मवीर  स्तब्ध झाला. घरी पोहोचल्यावर पत्नीचा मृतदेह पाहून तो ढसाढसा रडू लागला. ही घटना सोमवारी दुपारी घडली. या दोघांनी वर्षभरापूर्वीच प्रेमविवाह केला होता. घटनास्थळावरून कोणतीही सुसाइड नोट सापडली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. सोनम बराच काळ माहेरी होती आणि रविवारीच ती सासरी परतली. लग्नावरून काही दिवसांपासून पती-पत्नीमध्ये वाद सुरू होता. याच कारणावरून सोनम तिच्या माहेरी गेली होती. पोलिसांनी धर्मवीर, त्याचा भाऊ आणि इतरांची चौकशी केली. यानंतर पोलिसांनी सांगितले की, पतीशी फोनवर बोलल्यानंतर सोनमने गळफास लावून घेतला. त्यांच्या फोनवरील संभाषणानंतर काही वेळातच धर्मवीरचा भाऊ घरी पोहोचला होता. त्याने हा प्रकार सर्वांसमोर आणला. 
 

Web Title: Wife commits suicide due to husband-wife dispute, incident in Ghaziabad