पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावमधील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2022 13:25 IST2022-01-10T13:21:27+5:302022-01-10T13:25:01+5:30
विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० मे २००७ रोजी मित्राचा मुलगा असलेल्या सिंग सोबत विवाह लावून दिला.

पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या; मुंबईतील गोरेगावमधील घटना
मुंबई: पतीच्या अनैतिक संबंधामुळे सुरू असलेल्या अत्याचाराला कंटाळून ३३ वर्षीय विवाहितेने आयुष्य संपविल्याची घटना गोरेगाव परिसरात घडली. याप्रकरणी पती अजितप्रताप सिंग विरोधात आरे पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
विवाहितेच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार, १० मे २००७ रोजी मित्राचा मुलगा असलेल्या सिंग सोबत विवाह लावून दिला. लग्नानंतर काही वर्षाने पतीकडून तिला मारहाण सुरु झाली. ३ जानेवारी रोजी मुलीची प्रकृती गंभीर असल्याचा कॉल आला. रुग्णालयात धाव घेताच, तिचा मृत्यू झाल्याचे समजले. तेव्हा, सिंगकडे चौकशी करताच त्याने मुलीने गळफास घेतल्याचे सांगितले. सिंगच्या रोजच्या मारहाणीला कंटाळून तिने आत्महत्या केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.