शहरं
Join us  
Trending Stories
1
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
2
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
3
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
4
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
5
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
6
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
7
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
8
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
9
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
10
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
11
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
12
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
13
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
14
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
15
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
16
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
17
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
18
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
19
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
20
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय

पतीचे दुसरे लग्न रोखण्यासाठी पोहोचली पत्नी; सासरच्या मंडळींकडून मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2022 19:59 IST

Crime News : पती आणि त्याच्या भावांनी केलेल्या मारहाणीत पीडित महिला व तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत.

उत्तर प्रदेशातील कानपूर ग्रामीण भागात दुसरे लग्न करण्यासाठी जाणाऱ्या पतीला रोखण्यासाठी पत्नी आपले वडील आणि बहिणीसोबत पोहोचली, तेव्हा पतीने आपल्या कुटुंबीयांच्या मदतीने त्यांना लाठ्या-काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली. दरम्यान, पत्नीच्या कुटुंबीयांनी मारहाणीचा व्हिडिओ बनवला आहे.

पती आणि त्याच्या भावांनी केलेल्या मारहाणीत पीडित महिला व तिचे वडील गंभीर जखमी झाले आहेत. या दोघांनाही त्यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयात दाखल करून पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. यानंतर पीडितेने नातेवाईकांसह जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकांकडे न्यायाची मागणी करत त्यांचे कार्यालय गाठले. यावेळी एएसपींनी पीडितेला न्याय देण्याचे आश्वासन दिले आहे.

हे प्रकरण गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोगुमाळ गावचे आहे. पीडितेचे वडील कमलेश यांनी सांगितले की, 2018 मध्ये त्याची मोठी मुलगी वर्षा हिचे लग्न गोगुमाऊ येथील रहिवासी राघवेंद्रसोबत केले होते. जेव्हा तिच्या मुलीला मुलगी झाली, तेव्हा तिचा पती राघवेंद्र तिला सोबत घेऊन गेला नाही आणि पैशाची मागणी करू लागला. 

पीडितेच्या वडिलांनी सांगितले की, तेव्हापासून मुलगी त्यांच्यासोबत राहत होती, मात्र जावई गुपचूप पुन्हा लग्न करणार असल्याचे नातेवाईकांकडून समजले. मी मुलीसह तेथे पोहोचल्यावर सासरा कल्लू, मेव्हणा वीरेंद्र, पती राघवेंद्र, दीर सुरेंद्र आणि सासूने मारहाण केली. 

याचबरोबर, राघवेंद्रचा मोठा भाऊ वीरेंद्र यानेही पहिली पत्नी आणि मुले असतानाही दुसरे लग्न केले होते. पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र कोणतीही सुनावणी न झाल्याने एसपी कार्यालय गाठले, असे पीडितेच्या वडिलांनी सांगितले.

माझ्या लहान मुलीने वर्षा हिचा नवरा, मेव्हणा, दीर यांनी लाठ्या-काठ्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडिओ बनवला, जो तिने एसपींनाही दाखवला आहे. व्हिडिओ पाहिल्यानंतर एसपींनी आरोपींवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे, असेही पीडितेच्या वडिलांनी सांगितले. 

दरम्यान, या प्रकरणी एएसपी घनश्याम चौरसिया यांनी सांगितले की, महिला गजनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोगुमाऊ गावात आपल्या सासरच्या घरी गेली होती, पीडितेच्या आरोपावरून दोघांना तुरुंगात पाठवण्यात आले आहे. वैद्यकीय अहवाल आल्यानंतर पुढील कारवाई केली जाईल. पीडितेला न्याय मिळेल, दुसऱ्या लग्नाबाबत तक्रार आल्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.

टॅग्स :marriageलग्नCrime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश