शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

पतीच्या मृत्यूनंतर मिळालेले विम्याचे पैसे देत नाही म्हणून पत्नीसह नातेवाईकांना मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 21:11 IST

दोन वर्षांपूर्वी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने पतीचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देसासू सासरे, दीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

लोणी काळभोर : थेऊर (ता हवेली) येथे दोन वर्षांपूर्वी कर्करोगासारख्या दुर्धर आजाराने पतीचा मृत्यू झाला. त्यानंतर विमा कंपनीकडून पतीने काढलेल्या विमा पॉलिसीमुळे दोन लाख रुपये मिळाले. मात्र, माणुसकीहीन सासू, सासरे, दीर यांना त्या पैशांची मागणी करु लागले. ते पत्नी देत नसल्याने चिडून त्यांनी पत्नी, तिचा भाऊ आणि आईला लाकडी दांडके व हाताने मारहाण केली. ही घटना मंगळवारी (दि. १९ ) दुपारी घडली.      यासंदर्भात सिमा रामदास जाधव ( वय ३४, रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली ) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तिचे सासरे सखाराम साहेबराव जाधव, सासू अरूणाबाई सखाराम जाधव, दिर विनायक साहेबराव जाधव व त्याचा मुलगा शशिकांत विनायक जाधव( चौघे रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली )  यांचे वर मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये  फिर्यादी सिमा यांचेसह त्यांचा भाऊ रामदास वसंत चव्हाण, आई जिन्सबाई वसंत चव्हाण( तिघे रा, जाधववाडी, थेऊर, ता. हवेली )  यांना मारहाण करण्यात आली आहे.     पोलीस निरीक्षक सुरज बंडगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सिमा यांचे पती रामदास जाधव यांचे दोन वर्षांपूर्वी कर्करोगाने निधन झाले आहे. त्यानी विमा पॉलिसी काढली होती. त्यांचे मृत्यूनंतर सदर पॉलिसीची दोन लाख रुपये रक्कम वारसदार म्हणून त्यांची पत्नी सिमा यांना मिळाली आहे. सदर रक्कम आपणांस मिळावी म्हणून सासरे सखाराम, सासू अरूणाबाई, नणंद रूपाली संजय चव्हाण हे सिमा हिस सतत शिवीगाळ करत होते. परंतू दोन लाख रुपये दोन मुले व एका मुलीच्या भवितव्यासाठी ठेवले आहेत. मी तुम्हाला देणार नाही. असे तिने सांगितलेने ते तिचे आई - वडिल व भावावर चिडून होते.     मंगळवारी दुपारी १ - ३० वाजण्याच्या सुमारास सिमा यांचे बंधू रामदास चव्हाण हे आपल्या दुचाकीवरून कामावरून घरी परतत असताना सखाराम जाधव यांनी दुचाकी अडवून त्यांना शिवीगाळ केली व तुझी बहीण २ लाख रुपये देत नाही बघतो तुझ़्याकडे असे म्हणून काठीने मारहाण करण्यास सुरुवात केली. तेव्हा सिमा व त्यांच्या आई जवळ असल्याने भांडण सोडवण्यासाठी आल्या असता त्यांना सखाराम जाधव यांनी काठीने तर सासू अरूणाबाई जाधव, दीर विनायक जाधव व त्याचा मुलगा शशिकांत विनायक जाधव यांनी हाताने मारहाण केली. पुढील तपास पोलीस हवालदार गणेश करचे हे करत आहेत. 

टॅग्स :Loni Kalbhorलोणी काळभोरCrime Newsगुन्हेगारीPuneपुणेPoliceपोलिस