लग्नाच्या काही दिवसांनीच शेजाऱ्याच्या प्रेमात पडली महिला, पतीला समजलं आणि मग...
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2022 16:26 IST2022-10-04T16:25:48+5:302022-10-04T16:26:13+5:30
Crime News : लग्नानंतर काही सगळं काही ठीक सुरू होतं. यादरम्यान काही दिवसांनी जुली देवी गावातीलच एका शेजारी तरूणाच्या प्रेमात पडली.

लग्नाच्या काही दिवसांनीच शेजाऱ्याच्या प्रेमात पडली महिला, पतीला समजलं आणि मग...
Crime News : बिहारच्या (Bihar) मुजफ्फरपूरमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पत्नीने प्रियाकरासोबत मिळून पतीची गळा कापून हत्या केली. ही घटना परिया गावातील असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
परिया गावातील संजय झा याचं लग्न जुली देवीसोबत झालं होतं. लग्नानंतर काही सगळं काही ठीक सुरू होतं. यादरम्यान काही दिवसांनी जुली देवी गावातीलच एका शेजारी तरूणाच्या प्रेमात पडली. नंतर दोघेही लपून लपून एकमेकांना भेटत होते.
एक दिवस या प्रकरणाची माहिती जुली देवीच्या पतीला लागली. त्याने याचा विरोध केला. पण पतीने अनेकदा विरोध करूनही जुली देवीने प्रियकराला भेटणं काही बंद केलं नाही. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमीच वाद होत होता. या भांडणाला वैतागून पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीच्या हत्येचा प्लान केला.
जुली देवीचा पती संजय झा हा घराच्या दरवाज्यासमोर एकटाच झोपत असे. याचाच फायदा घेत सोमवारी राती पत्नीने प्रियकराला भेटण्यास बोलवलं. दोघांनी प्लान केला आणि दरवाज्याजवळ झोपलेल्या पतीचा गळा चाकूने कापला. त्याचा जागीच मृत्यू झाला. नंतर दोन्ही आरोपी आपापल्या घरी जाऊन झोपले.
जेव्हा सकाळी दरवाज्यात संजय झा चा मृतदेह दिसला तर याची माहिती पोलिसांना देण्यात आली. सूचना मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांना मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमला पाठवला.
पोलिसांनी सांगितलं की, परिया गावातील संजय झा याची हत्या करण्यात आली होती. हत्येच्या आरोपात मृतकाची पत्नी आणि तिचा शेजारी प्रियकर यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. प्रकरणाची चौकशी सुरू आहे. चौकशीनंतर कारवाई केली जाईल.