विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2022 19:10 IST2022-03-11T18:59:19+5:302022-03-11T19:10:42+5:30

Rape Case : कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो फरार झाला.

Widow raped by tenant for 6 months; Fleeing while pregnant | विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार

विधवेवर भाडेकरूने ६ महिने केला बलात्कार; गर्भवती राहिल्यावर झाला फरार

भटिंडा येथे एका भाडेकरूने विधवा घरमालकाचा सहा महिन्यांपासून बलात्कार केला. ती गरोदर राहिल्यावर तो नराधम पळून गेला. तरुणीच्या तक्रारीवरून पोलिसांनी तरुणाला अटक केली आहे. शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटल भटिंडा येथून तिचे मेडिकल करून घेतल्यानंतर त्याला कोर्टात हजर केले असता चौकशीसाठी पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

विशेष म्हणजे चार दिवसांपूर्वी एका २२ वर्षीय विधवेने पोलिसांत तक्रार देऊन दीड वर्षांपूर्वी पतीचा मृत्यू झाल्याचे सांगितले होते. ती आपल्या मुलांसोबत राहते आणि कष्ट करते. घराचा खर्च भागवण्यासाठी तिने घरातील एक खोली फिरोजपूर येथील रवी कुमार याला भाड्याने दिली. सुमारे सहा महिन्यांपूर्वी रवीने रात्री तिच्या खोलीत घुसून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला. त्यानंतर तिला धमकावून तिच्यावर अनेकवेळा बलात्कार केला. कोणाला काही सांगितले तर मुलांना मारून टाकू, अशी धमकी दिली. आता ती त्याच्या मुलाची आई होणार होती, म्हणून तो फरार झाला.

Web Title: Widow raped by tenant for 6 months; Fleeing while pregnant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.