शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

विधवा महिलेने एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने प्रियकराची केली हत्या, मृतदेह रात्रभर सोबत ठेवला, मग..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2022 17:13 IST

Murder case :याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.

राजनांदगाव : छत्तीसगडच्या राजनांदगाव पोलिसांनी एका हत्येचे गूढ उकलल्याचा दावा केला आहे. या प्रकरणाचा लालबाग पोलीस ठाण्याने पर्दाफाश केला आहे. अनैतिक प्रेमसंबंधातून आरोपीने ही घटना घडवून आणल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. १३ जुलै रोजी बगतराई ते लिटिया गावादरम्यानच्या रस्त्यावर अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. राजनांदगाव पोलीस अधीक्षकांनी पत्रकार परिषद घेऊन खुलासा केला. याप्रकरणी २ जणांना अटक करण्यात आली आहे.

राजनांदगावचे पोलीस अधीक्षक प्रफुल्लकुमार ठाकूर यांनी पत्रकार परिषद घेऊन हत्येचे गूढ उकलल्याचा दावा केला. १३ जुलै रोजी बागतराई आणि लिटिया या गावादरम्यान पोलिसांना एक अनोळखी मृतदेह आढळून आला होता. या संपूर्ण प्रकरणाचा तपास लालबाग पोलीस स्टेशन करत होते. हिरावन मांडले (वय ३१ वर्षे) असे मृताचे नाव असून तो लिटिया गावचा रहिवासी आहे. मृताची ओळख पटल्यानंतर पोलीस या संपूर्ण प्रकरणाच्या तपासात गुंतले. तपासादरम्यान, आरोपी गावातील एका विधवा महिलेशी संबंधित असल्याचे पोलिसांना समजले, पोलिसांनी महिलेवर संशय घेऊन चौकशी केली.एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने केला खूनपोलिस तपासात आरोपी महिलेने तिच्या एका एक्स बॉयफ्रेंडच्या मदतीने संपूर्ण घटना घडवून आणल्याचे सांगितले. अवैध प्रेमसंबंधातून आरोपीने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. आरोपींनी मृताच्या डोक्यात शीग मारून खून केला होता. खून केल्यानंतर मृतदेह रस्त्याच्या कडेला फेकून दिला. आरोपी महिला मोमीन वर्मा आणि तिचा प्रियकर डिकेश्वर वर्मा या दोघांनी मिळून मृत तरुणाची हत्या केली. आरोपींनी पद्धतशीरपणे मृताला फोन करून घरी बोलावून घेतले आणि घरातच तरुणाची शीग मारून हत्या करून मृतदेह रात्रभर घरात ठेवला, त्यानंतर तो रस्त्याच्या कडेला नेऊन फेकून दिला. मृतकाला वारंवार भेटण्याच्या दबावाला कंटाळून आणि शिवीगाळ करत असल्याने आरोपी महिला आणि तिच्या माजी प्रियकराने हा संपूर्ण प्रकार घडवून आणला. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसChhattisgarhछत्तीसगडArrestअटकDeathमृत्यू