"बॅनरवर फोटो का टाकला नाही?", तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण
By दिपक दुपारगुडे | Updated: April 22, 2023 15:41 IST2023-04-22T15:41:07+5:302023-04-22T15:41:32+5:30
या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

"बॅनरवर फोटो का टाकला नाही?", तरुणाला हॉकी स्टीकने मारहाण
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या बॅनरवर माझा फोटो का टाकला नाही म्हणत पाच ते सहा जणांनी मिळून हॉकी स्टिक व दगडाने मारहाण केल्याने तरुण जखमी झाला आहे. कुणाल दत्ता खरात ( वय २३, रा. हब्बू वस्ती, देगाव) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे.
सोलापुरात २३ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, जखमी कुणाल हे शुक्रवारी रात्री घरासमोर थांबलेले असताना त्यांच्याजवळ चार ते पाच जण आले. त्यांनी जयंतीच्या बॅनरवर फोटो का टाकला नाही म्हणत वाद घालू लागले.
या वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. कुणाल यांना हॉकी स्टीक, काठी व दगडाने मारहाण करण्यात आली. यात जखमी झाल्याने त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.