शहरं
Join us  
Trending Stories
1
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
2
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
3
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
4
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
5
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
6
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
7
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
8
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
9
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना
10
भारताकडून हरल्यावर पाकिस्तानचा रडीचा डाव, या गोष्टीवरून पुन्हा ICCकडे केली तक्रार  
11
शेअर असावा तर असा...! सरकारची एक घोषणा अन् थेट ₹4000 नं वाढला; एकाच दिवसात केली कमाल, गुंतवणूकदारांना केलं मालामाल!
12
Video: रस्त्यात खड्डे की, खड्ड्यात रस्ते..? 5 प्रवाशांना घेऊन Scorpio-N अख्खी बुडाली...
13
गौतम अदानींची 'पॉवर'फुल कामगिरी; अवघ्या 2 दिवसांत केली 1.7७ लाख कोटींची कमाई
14
कॉकपिटमध्ये घुसण्याचा प्रयत्न; नऊ प्रवासी ताब्यात, एअर इंडियाच्या विमानात नेमकं काय घडलं?
15
मराठवाड्यातील अतिवृष्टीचा एकनाथ शिंदेंनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद
16
शेअर आहे की पैशांचं झाड...? या महारत्न कंपनीनं गुंतवणूकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे केले थेट 25 लाख! 3 वेळा वाटले बोनस शेअर
17
पाकिस्तानात निसर्गाचा हाहाकार; मुसळधार पाऊस अन् पुरामुळे 1 हजारहून अधिक जणांचा मृत्यू
18
भारताविरोधात गन सेलिब्रेशन करणाऱ्या पाकिस्तानच्या फरहानचा माजोरडेपणा कायम, आता म्हणाला....
19
काँग्रेसचे नेते आणि हिमाचलमधील मंत्री विक्रमादित्य सिंह यांनी केलं दुसरं लग्न, कोण आहे त्यांची दुसरी पत्नी?
20
डीजेचा मोठा आवाज ठरेल जीवघेणा; हार्ट अटॅक, ब्रेन हॅमरेजचा धोका, फुटू शकते मेंदूची नस

स्वदिच्छा गायब झाली नेमकं त्याच रात्री फूडस्टॉलवर का थांबला अन्सारी? 

By गौरी टेंबकर | Updated: January 17, 2023 06:48 IST

गुन्हे शाखेकडून गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ८ ते १२ वयोगटातील चार ते पाच मुलांनादेखील चौकशीसाठी रविवारी बोलाविण्यात आले होते.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने (२२) हिच्या  बेपत्ता प्रकरणामध्ये गुन्हे शाखेने जीवरक्षक मिथू सिंग याच्यासह त्याचा मित्र अब्दुल जब्बार अन्सारी यालाही अटक केली आहे. अन्सारी हा कधीही फूडस्टॉलवर थांबत नव्हता. मात्र ‘त्या’ रात्री तो तिथे का थांबला? याचा तपास पोलिस करत आहेत.

सिंग हा अन्सारीसोबत गणेशनगर रहिवासी संघ बँडस्टँड येथे मीत किचन नामक फूडस्टॉल चालवतो. सूत्रांच्या म्हणण्यानुसार, २९ नोव्हेंबर २०२१ रोजी रात्री १ वाजून ९ मिनिटांनी स्वदिच्छा तेथे आली. सिंगने २ वाजून २५ मिनिटांनी सेल्फी काढले. स्वदिच्छा साने ही सिंगसोबत बँडस्टँडच्या खडकावर बसली असल्याचे समजल्यावर अन्सारीने सिंगला फोन करून तिच्याबाबत अश्लील वक्तव्य केले. अन्सारीवरील संशय वाढण्याचे अजून एक कारण म्हणजे तो रात्रीच्या वेळी फूडस्टॉलवर कधीच थांबत नव्हता. मात्र ज्या रात्री स्वदिच्छा गायब झाली नेमक्या त्याच रात्री तो तिथे थांबला होता. दोघांच्या मोबाइलची फॉरेन्सिक चाचणी होणार आहे.

‘त्या’ ४२ वाहनांचीही चौकशी

स्वदिच्छा साने ही सिंगला रात्री भेटली तेव्हापासून सकाळपर्यंत त्या परिसरातून ४२ दुचाकी गेल्याचे दिसते. त्या सर्व गाड्यांचे मालक व चालक यांना शोधून काढत त्यांचीही चौकशी करत सीसीटीव्ही पडताळण्यात आले. मात्र त्या फूटेजमध्येही ती अधिकाऱ्यांना दिसली नाही.

आयकार्डची मुलांकडे चौकशी!

गुन्हे शाखेकडून गणेशनगर परिसरात राहणाऱ्या ८ ते १२ वयोगटातील चार ते पाच मुलांनादेखील चौकशीसाठी रविवारी बोलाविण्यात आले होते. स्वदिच्छाची हुडी, मोबाइल, बॅग तसेच ओळखपत्राबाबत त्यांच्याकडे पोलिस चौकशी करत आहेत, तसेच सिंग कुटुंबातील सर्वांचे मोबाइल फोनदेखील हस्तगत करण्यात आले आहेत.

मृतदेह सापडला नाही तरी...माझ्या दिराला तो आठ महिन्यांचा असल्यापासून मी ओळखते. मृतदेह सापडला नाही तरी त्या मुलीच्या हत्येचा आरोप त्याच्यावर केला जात आहे. त्याच्या नार्को आणि अन्य चाचण्यांमध्येही काही संशयास्पद आढळलेले नाही. आम्हाला आणि त्याच्या वकिलालादेखील त्याची भेट नाकारली जात आहे. त्यांनी मुलीची मदत केली, ते त्याच्या अंगाशी आले. - गंगा भागवत सिंग, मिथू सिंगची मोठी वहिनी

टॅग्स :Missingबेपत्ता होणं