Chinnu Papu found dead in kerala home: सोशल मीडिया विश्वातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी समोर आली आहे. केरळमधील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर (SocialMedia Influencer) आणि मॉडेल चिन्नू पप्पू हिचा मृत्यू झाला असून, या घटनेने तिच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. केरळमधील लोकप्रिय सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर चिन्नू पप्पू (वय २४) हिचा मृतदेह तिच्या राहत्या घरी संशयास्पद स्थितीत आढळला. तिच्या निधनाच्या बातमीने मल्याळम चित्रपटसृष्टी आणि सोशल मीडिया जगतात शोककळा पसरली आहे.
नेमके काय घडले?
प्राथमिक माहितीनुसार, चिन्नू पप्पू मंगळवारी तिच्या घरात मृतावस्थेत आढळली. तिच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, शवविच्छेदन अहवालानंतरच मृत्यूचे अधिकृत कारण समोर येईल. ही आत्महत्या आहे की घातपात, यावर चर्चा रंगली असल्याने पोलीस या दिशेने सध्या चौकशी करत आहेत.
चिन्नू पप्पू कोण होती?
चिन्नू पप्पू ही इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवरील एक प्रसिद्ध चेहरा होती. मूळची केरळची असलेल्या चिन्नूने आपल्या अभिनयाने आणि विनोदी व्हिडिओंनी अल्पावधीतच मोठी लोकप्रियता मिळवली होती. इन्स्टाग्रामवर तिचे लाखो फॉलोअर्स आहेत. तिची बोलण्याची शैली आणि लूकमुळे तरुण वर्गात ती प्रचंड लोकप्रिय होती. सोशल मीडियावरील यशामुळे तिला काही अल्बम गाणी आणि जाहिरातींमध्येही काम करण्याची संधी मिळाली होती.
अचानक टोकाचं पाऊल का?
चिन्नूच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर वाऱ्यासारखी पसरली. तिचे चाहते आणि सहकारी इन्फ्लुएन्सर्स सोशल मीडियाच्या माध्यमातून तिला श्रद्धांजली वाहात आहेत. "एवढ्या लहान वयात तिने जगाचा निरोप घेणे मनाला पटणारे नाही," अशा भावना अनेक युजर्सनी व्यक्त केल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच तिने एक आनंदी व्हिडिओ पोस्ट केला होता. त्यामुळे तिने टोकाचे पाऊल का उचलले असावे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
मानसिक आरोग्याचा प्रश्न चर्चेत
गेल्या काही काळापासून अनेक तरुण सोशल मीडिया स्टार्सचे मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. चिन्नूच्या निधनानंतर पुन्हा एकदा ग्लॅमर जगतातील मानसिक ताण आणि नैराश्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. पोलीस तिच्या जवळच्या मित्र-मैत्रिणींची आणि नातेवाईकांची चौकशी करत असून, तिच्या मोबाईल चॅट्सचीही तपासणी केली जात आहे. केरळ पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून लवकरच अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
Web Summary : Social media influencer Chinnu Papu, 24, was found dead at her Kerala home. Police are investigating the suspicious death, exploring possibilities of suicide or foul play. Her popularity stemmed from Instagram and YouTube videos. The cause of death is currently undetermined.
Web Summary : केरल में सोशल मीडिया इन्फ्लुएंसर चिन्नू पापु, 24, अपने घर पर मृत पाई गईं। पुलिस संदिग्ध मौत की जांच कर रही है, आत्महत्या या हत्या की आशंका है। इंस्टाग्राम और यूट्यूब वीडियो से मिली थी लोकप्रियता। मौत का कारण अज्ञात है।