शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
3
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
4
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
5
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
6
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
7
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
8
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
9
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
10
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
11
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
12
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
13
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
14
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
15
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
16
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
17
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
18
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
19
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
20
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!

माहिमच्या मायलेकाकडून पोलिसांना 'व्हिस्की' आणि 'ब्रॅण्डी'ची भेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 13:31 IST

माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे.

ठळक मुद्देन पोलीस दलात सहभागी झाल्यामुळे मला जवानाच्या आईसारखे वाटल्याची भावना रक्षीताने ट्ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी देखील या तिन्ही श्वानांना मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षित करण्याचे आश्वासित केले आहे.

मनीषा म्हात्रे

मुंबई - माहिमच्या रहिवाशी असलेल्या रक्षिता मेहता आणि त्यांचा त्यांचा मुलगा शरयु यांनी त्यांची नुकतीच जन्मलेली तीन जर्मन शेफर्ड पिल्ले गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी मुंबईपोलिसांना दिली आहे. शिराज़, नाॅयर आणि वोडका असे त्यांचे नाव आहे. व्हिस्की (नर) आणि ब्रॅण्डी (मादी) जातीच्या श्वानाचा वापर अमली पदार्थ विरोधी पथक आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी करण्यात येणार आहे. याविषयी रविवारी मुंबई पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी ट्ट्विटद्वारे माहिती दिली. तर, श्वान पोलीस दलात सहभागी झाल्यामुळे मला जवानाच्या आईसारखे वाटल्याची भावना रक्षीताने ट्ट्विटद्वारे व्यक्त केली आहे. माहिमच्या रहिवासी असलेल्या मेहता यांचा इन्फ्रास्ट्रक्चरचा व्यवसाय आहे. त्यांच्याकड़े १५ जर्मन शेफर्ड प्रजातीचे श्वान आहेत. विविध माद्यांची नावे त्यांना देण्यात आली आहेत. दोन महिन्यांपूर्वी, ब्रॅण्डीने त्यांच्या डहाणू फार्म हाऊसवर पाच पिल्लांना जन्म दिला. राशिता यांच्या म्हणण्यानुसार, ही पिल्ल खरोखरच गोंडस होती आणि पुष्कळ लोक दत्तक घेण्यासाठी त्यांच्याकडे येत होते परंतु त्यांनी ते दिले नाही. दहा दिवसापूर्वी त्यांच्या एका नातेवाईकाने त्यांना सुचवले की जर्मन शेफर्ड्स उत्कृष्ट स्निफर श्वान म्हणून ओळखले जातात आणि गुन्हेगारांचा शोध घेण्यासाठी पोलिसांना ते खूप मदत करतात."जेव्हा आम्ही याबद्दल ऐकले, तेव्हा मी आणि माझा मुलगा शौर्य यांनी तातडीने या पिल्लांना देशाची सेवा देण्यासाठी मुंबई पोलिसांना देण्याचे ठरविले. आणि पोलिसांसोबत संपर्क साधत त्यांच्यासमोर याबाबतचा प्रस्ताव ठेवला. हे ऐकून अधिकारी खूप खूष झाले आणि त्यांनी लगेचच ते मान्य केले व आपल्या वरिष्ठांनीही आनंदाने होकार देण्याची परवानगी घेतली. त्यानंतर मुंबई पोलिसांच्या श्वानपथकास सूचित केले गेले. त्यांनी तातडीने मेहता यांच्याशी संपर्क साधत आणि त्यांच्या पिल्लांना घेण्यासाठी त्यांच्या डहाणूच्या फार्म हाऊसकडे आले. अवज्ञा आठवड़्याभरात ही प्रक्रिया पार पड़ल्याचेही त्यांनी सांगितले. मुंबई पोलीस दल हे देशात सर्वोत्तम आहे. माझे श्वान देशसेवेसाठी दलात सहभागी होत असल्याचा अभिमान व्यक्त करत, त्यामुळे मला जवानाची आई असल्यासारखे वाटत असल्याचे रक्षिता यांनी सांगितले. मेहतांकडे अद्याप व्हिस्की आणि ब्रॅण्डीची दोन इतर पिल्ले आहेत आणि ती ते पोलीस दलाला देण्याचा विचार करीत आहेत. "ते दोन महिने जुने आहेत आणि आमचे व्यावसायिक प्रशिक्षक त्यांना प्रशिक्षण देतील. जर्मन शेफर्ड हे मादक पदार्थ आणि आरडीएक्स शोधण्यासाठी प्रसिद्ध आहेत आणि म्हणूनच ते आमच्या वापरासाठी योग्य आहेत. हे कुत्री मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विभागासाठी वापरता येतील," असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.  पोलीस आयुक्त संजय बर्वे यांनी देखील या तिन्ही श्वानांना मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी योग्य पद्धतीने प्रशिक्षित करण्याचे आश्वासित केले आहे.

टॅग्स :PoliceपोलिसMumbaiमुंबईdogकुत्राTwitterट्विटरSanjay Barveसंजय बर्वे