भुसावळ : सातबारा उताऱ्यावरील बोजा कमी करण्यासाठी अवघी २४० रुपयांची लाच मागणाऱ्या तालुक्यातील कुऱ्हे पानाचे येथील तलाठी प्रवीण मेश्राम व कोतवाल प्रकाश अहिर यांना जळगाव एसीबीच्या पथकाने सोमवारी दुपारी दीड वाजता तलाठी कार्यालयात रंगेहाथ अटक केल्याने महसूल वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.या संदर्भात वृत्त असे की, तक्रारदार यांनी त्यांच्या शेतावर गावातील विकास सोसायटीच्या कर्जाचा बोजा बसविला होता. कर्ज परतफेड केल्यामुळे उताऱ्यावर असलेला बोजा कमी करण्यासाठी ते गेले असता, कुऱ्हे पानाचे तलाठी प्रवीण श्रीकृष्ण मेश्राम व कोतवाल प्रकाश दामू अहिरे यांनी प्रारंभी फिरवाफिरव केली. त्यानंतर, बोजा उतरविण्यासाठी त्यांनी फिर्यादीकडे २४० रुपयांची मागणी केली. अखेर फिर्यादीने लाचलुचपत कार्यालयाशी संपर्क साधला. त्यानुसार, लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या पथकाने सापळा रचला होता. तलाठी कार्यालय येथे दुपारी १.३० वाजता लाचेची रक्कम आणून देण्याचे ठरले होते. त्यानुसार, हे पैसे फिर्यादीकडून घेताच, पथकाने या दोघांना ताब्यात घेतले. लाचलुचपत विभागाचे डीवायएसपी गोपाल ठाकूर, पोलीस निरीक्षक नीलेश लोधी, संजोग बच्छाव, सहायक फौजदार रवींद्र माळी, अशोक अहिरे, सुनील पाटील, सुरेश पाटील, मनोज जोशी, सुनील शिरसाठ, जनार्दन चौधरी, प्रवीण पाटील, नासिर देशमुख, ईश्वर धनगर यांनी ही कारवाई केली. दोन्ही आरोपींना ताब्यात घेण्यात आले. या कारवाईने महसूल विभागात एकच खळबळ उडाली आहे.
२४० रुपयांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2021 20:36 IST
ACB trap : जळगाव एसीबीचे पोलीस उपअधीक्षक गोपाळ ठाकूर यांच्या नेतृत्वात हा सापळा यशस्वी करण्यात आला.
२४० रुपयांची लाच घेताना तलाठी, कोतवाल एसीबीच्या जाळ्यात
ठळक मुद्देकुऱ्हे पानाचे तलाठी प्रवीण श्रीकृष्ण मेश्राम व कोतवाल प्रकाश दामू अहिरे यांनी प्रारंभी फिरवाफिरव केली.