अंबाबाई मंदिर परिसरात चोरच चोराचे पाकिट मारताना सापडतो तेव्हा...

By भीमगोंड देसाई | Updated: August 11, 2023 21:17 IST2023-08-11T21:15:54+5:302023-08-11T21:17:15+5:30

शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

When a thief is found in the Ambabai temple area beating a thief's wallet... | अंबाबाई मंदिर परिसरात चोरच चोराचे पाकिट मारताना सापडतो तेव्हा...

अंबाबाई मंदिर परिसरात चोरच चोराचे पाकिट मारताना सापडतो तेव्हा...

कोल्हापूर : येथील करवीर निवासिनी अंबाबाई मंदिर परिसरात गर्दीचा फायदा घेवून एक चोरटा महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करीत असताना खासगी सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले. त्यावेळी दुसरा चोरटा पकडलेल्या चोरट्याच्या खिशातील पाकीट चोरत होता. दोघांनाही पकडून सुरक्षा रक्षकाने पोलिसाच्या ताब्यात दिले. शुक्रवारी दुपारी दीडच्या सुमारास ही घटना घडली.

घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, अंबाबाई मंदिरात शुक्रवारी नेहमीप्रमाणे दर्शनासाठी भाविकांची गर्दी झाली होती. दर्शनासाठी लांब रांग लागली होती. त्यावेळी एक चोरटा महिला भाविकाच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचा प्रयत्न करीत होता. हा प्रकार निदर्शनास येताच खासगी सुरक्षा रक्षकाने त्याला पकडले. काही वेळातच तिथे गर्दी झाली. 

गर्दीचा गैरफायदा घेवून दुसरा एक चोरटा पकडलेल्या चोरट्याच्या खिशातून पाकीट मारत होता. हाही प्रकार समोर आल्यानंतर तातडीने त्यालाही ताब्यात घेण्यात आले. दोघा चोरट्यांना पकडून खासगी सुरक्षा रक्षकांनी मंदिरात बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांकडे दिले. मात्र याची नोंद रात्री उशिरापर्यंत जुना राजवाडा पोलिसांनी झाली नव्हती.

Web Title: When a thief is found in the Ambabai temple area beating a thief's wallet...