शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Whatsapp वर येतोय मुलीचा व्हिडिओ कॉल? चुकूनही उचलू नका, नाही तर...; खतरनाक आहे संपूर्ण प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 15:24 IST

या नव्या व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. जाणून घ्या कसा सुरू होतो संपूर्ण प्रकार आणि अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे...?

सोशल मीडिया आणि मेसेजिंग अ‍ॅप्सवर लोकांना फसवण्यासाठी स्कॅमर्स वेगवेगळ्या युक्त्या वापरत असतात. आजकाल इंटरनेट युजर्सना व्हिडिओ कॉलच्या माध्यमाने ब्लॅकमेल केले जात आहे. व्हॉट्सअ‍ॅप व्हिडीओ कॉलच्या माध्यमाने युजरला फसवून त्या बदल्यात पैशांची मागणी करण्याचा नवा प्रकार सुरू झाला आहे. हा स्कॅम टाळण्यासाठी सतर्क राहणे अत्यंत आवश्यक आहे.

या नव्या व्हॉट्सअ‍ॅप व्हिडिओ कॉल स्कॅममध्ये, एका अनोळखी मुलीकडून व्हिडिओ कॉल केला जातो आणि कॉल दरम्यान होणाऱ्या कृतीचे स्क्रीन-रेकॉर्डिंग केले जाते. नंतर हे स्क्रीन रेकॉर्डिंग पीडित व्यक्तीला पाठवले जाते आणि तिच्याकडे पैशांची मागणी केली जाते. पैशांची ही मागणी करताना पैसे न पाठवल्यास संबंधित रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकीही पीडित व्यक्तीस दिली जाते. यानंतर आपली बदनामी टाळण्यासाठी लोक याला बळी पडतात आणि पैसे देतात.

अशी सुरू होते स्कॅमची सुरुवात -सर्वप्रथम एका अनोळखी नंबरवरून मेसेज येतो आणि समोरच्या व्यक्तीला मुलगी असल्याचे भासवून व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले जाते. याशिवाय, एखाद्या अज्ञात नंबरवरून थेट व्हिडिओ कॉलही येऊ शकतो. यानंतर तुम्ही तो कॉल रिसिव्ह करताच समोरची व्यक्ती तुमचा चेहराही रेकॉर्ड करते.

व्हिडिओ कॉलदरम्यान नेमकं काय होते? -बहुतांश प्रकरणांमध्ये कॉल करणाऱ्याचा चेहरा दिसत नाही. तर एक वेगळीच मुलगी अश्‍लील कृत्य करताना दिसते. याच वेळी ही मुलगी त्यासंदर्भात तुमची प्रतिक्रियाही नोंदवत असते आणि समोरच्याला त्याचा चेहरा रेकॉर्ड होत असल्याची साधी भनकही  लागत नाही. काहीवेळा तर समोर मुगलीसुद्धा नसते आणि स्कॅमर्स रेकॉर्डिंग करत असतात. या अश्‍लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग कॉल संपताच पीडित व्यक्तीला पाठवले जाते.

...अन् मग सुरू होते ब्लॅकमेलिंग -या अश्लील व्हिडिओ कॉलचे रेकॉर्डिंग व्हायरल करण्याची धमकी देत, स्कॅमर्स संबंधित व्यक्तीकडे पैशांची मागणी करतात. यानंतर स्कॅमर्सच्या जाळ्यात अडकलेल्या व्यक्तीकडे वारंवार पैसे मागितले जातात. व्हिडीओ कॉल दरम्यान केलेली आपली कृत्ये व्हायरल होऊ नये, म्हणून पीडित व्यक्तीही पैसे देत राहते.

अशा स्कॅमपासून सुरक्षित राहण्यासाठी काय करायला हवे? -जर यदा कदाचित अशा प्रकारच्या स्कॅमला बळी पडलाच तर कुठल्याही प्रकारे पैसे न देता सरळ पोलिसांच्या सायबर सेलकडे तक्रार करा. कोणत्याही अनोळखी नंबरवरून चुकूनही व्हिडिओ कॉल्स घेऊ नका. कारण काही सेकंदांसाठीही तुमचा चेहरा दिसणे स्कॅमर्ससाठी पुरेसे आहे. याशिवाय, कुणावरही ऑनलाइन विश्वास ठेवण्याची चूक करू नका. तसेच तुम्हाला व्हिडिओ कॉल करायचा असेल किंवा घ्यायचा असेल तर, तुमचा सेल्फी कॅमेरा सर्वप्रथम बंद करून ठेवा आणि मगच कॉलवर जा. अशा प्रकारे तुम्ही स्वतःला सुरक्षित ठेऊ शकता.

टॅग्स :WhatsAppव्हॉट्सअ‍ॅपPoliceपोलिसhoneytrapहनीट्रॅप