'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2020 08:33 PM2020-10-08T20:33:51+5:302020-10-08T20:35:37+5:30

TRP Scam : काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

What exactly is a 'TRP scam'? ... Know! | 'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!

'TRP घोटाळा' नक्की आहे तरी काय?... जाणून घ्या!

googlenewsNext
ठळक मुद्देदोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचे ठरेल.

टीव्ही चॅनल्सच्या उद्योगाला हादरवून सोडणारी बातमी आली आहे. देशातला टीव्ही वाहिन्यांच्या उद्योगाचा आकार हा ३० ते ४० हजार कोटींचा आहे. काही चॅनल्सनी टीआरपी वाढवण्यासाठी रॅकेट चालवल्याचा आरोप मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी केला आहे.

इंग्रजी येत नाही अशा व्यक्तींच्या घरी इंग्रजी चॅनल
टीआरपी म्हणजेच टेलिव्हीजन रेटींग पॉईंट वाढवण्यासाठी काही चॅनल्सनी पैसे दिले आणि हे रॅकेट मुंबईपोलिसांच्या गुन्हे शाखेने उद्ध्वस्त केल्याचा दावाही मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पत्रकार परिषदेत केला. या रॅकेटमध्ये दोन आरोपींना अटकही करण्यात आली आहे. या आरोपींनी ज्या घरांमध्ये टीआरपी मिटर लावले होते. त्या प्रेक्षकांना संपर्क साधून त्यांना विशिष्ट चॅनल पाहण्यासाठी बाध्य केलं गेलं. त्यांना पैसेही दिले गेले, असा आरोपही त्यांनी केला गेलाय. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन कंपन्यांच्या मालकांना पोलिसांनी अटक केली आहे. ज्या घरांमध्ये इंग्रजी येत नाही, अशा घरांमध्येही इंग्रजी चॅनल लावण्यासाठी पैसे देण्यात आल्याचंही पोलिसांच्या निदर्शनास आलं आहे.

Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत


टीआरपीनुसार जाहिरातीचा दर
टीआरपीमध्ये वाढ झाल्यास त्याचा फायदा या चॅनल्सना जाहीरातीचे दर वाढवण्यात आणि व्यवसाय वाढवण्यात कामी येत असतो. आम्ही बीएआरसी या संस्थेच्याही संपर्कात आहोत आणि अधिक माहिती घेण्यात येत आहे. ही माहिती माहिती व प्रसारण मंत्रालयाला देण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या तपास यंत्रणांना तपास करण्याची विनंती करण्यात येणार असल्याचंही परमबीर सिंग यांनी म्हटलंय. बीएआरसी या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेनी दिलेल्या अहवालानुसार या रिपब्लिक चॅनलच्या रेटिंगमध्येही अविश्वसनीय अशी वाढ दिसली आहे. त्यामुळे या चॅनलचाही या रॅकेटमध्ये सहभाग असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रिपब्लीक चॅनलचे संचालक आणि मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांनाही समन्स पाठवले जाण्याची शक्यता आहे आणि आजच हे समन्स जारी केले जाणार आहे. अधिक तपास केल्यानंतर गरज पडली तर रिपब्लिकच्या संचालकांनाही चौकशीसाठी बोलावलं जाईल, असंही परमबिर सिंग यांनी स्पष्ट केलं आहे. 

हा प्रकार उघडकीला आला तो एका हंसा नावाच्या संस्थेच्या एका माजी कर्मचाऱ्याला अटक केल्यानंतर... 

 

हंसा कंपनीकडे टीव्हीला बॅरोमिटर लावायचं काम दिलं होतं. हे मिटर लावतानाची जी काही माहिती असते ती गुप्त ठेवली जात असते. मात्र, काही ठिकाणी पैसे देऊन हे मिटर लावले जात असल्याचा आणि एक प्रकारचं रॅकेट यात काम करत असल्याची हंसाच्या एका माजी कर्मचाऱ्यांनी मुंबई पोलिसांना दिली. तक्रारींच्या आधारावर त्याला अटक करण्यात आली होती. सखोल तपास केला असता या कर्मचाऱ्याच्या खात्यात २० लाख रूपये असल्याचं आढळून आलं. तसंच त्याच्या बँक लॉकरमध्येही साडे आठ लाख रूपये असल्याचं निदर्शनास आलं. ही सगळी रक्कम जप्त करण्यात आल्याचंही पोलिस आयुक्तांनी सांगितलं. त्या माहितीच्या आधारे तपास करून मुंबई पोलिसांनी या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. टाईम्स नाऊच्या वरिष्ठ पत्रकार मेघा प्रसाद यांनी त्यांच्या लाईव्हमध्ये सांगितलं की, अशा प्रकारे टीआरपीमध्ये घोटाळा होत असल्याच्या तक्रारी या गेल्या ३ वर्षांपासून येत होत्या आणि अशा तक्रारी फक्त मुंबई पोलिसच नाही तर इतरही काही राज्यांच्या पोलिसांकडे आल्या होत्या. देशातल्या अशा भागांत अचानक घरांचे असे काही समुह उभे राहिले जिथे लोकसंख्या अत्यंत तुरळक होती. म्हणजे छत्तीसगड, झारखंड अशा राज्यांमध्ये मोठ्या संख्येनी बॅरोमिटर्स लावण्यात आले होते. 

काही चॅनलच्या टीआरपीमध्ये अचानक वाढ झाली होती. ती देखील काही विशेष काही न करत ... 

 

ज्या भागांत अत्यंत गरीब लोकं राहतात किंवा जिथे झोपडपट्टीसारखी वस्ती आहे.  त्या भागांत असे मिटर लावण्यात आले आणि त्या ठिकाणच्या लोकांना पैसे देऊन विशिष्ट चॅनल पाहायला लावले जात असल्याची माहिती पोलिसांपर्यंत पोहोचली होती. मुंबई पोलिसांनी हंसाच्या माजी कर्मचाऱ्यांनी दिलेल्या माहितीच्या आधारावर तपास केला आणि या रॅकेटचा पर्दाफाश केला. विशेष मह्णजे ही पत्रकार परिषद गुरूवारी घेण्यात आली. गुरूवारीच बार्क या टीआरपी मोजणाऱ्या संस्थेचे देशभरातल्या चॅनलचे आकडे जाहीर केले जातात. त्यामुळे आजचाच दिवस निवडण्यात आला हे विशेष... सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपब्लीक टीव्हीच्या संचालकांना आणि संपादकांना मुंबई पोलिस समन्स बजावणार आहेत. आजच हे समन्स बजावलं जाणार आहे. यात अजून एक धक्कादायक बाब म्हणजे ज्या चॅनल्सनी अशा पध्तीनी कृत्रीम पध्दतीनी टीआरपी वाढवून जाहिराती मिळवल्या, त्या जाहीतींचा पैसा हा गुन्हा  समजला जाणार आहे. रिपब्लीक चॅनलचे पत्रकार या पत्रकार परिषदेला उपस्थित नव्हते. याचाच अर्थ अशा प्रकारची काही तरी घटना घडली याची पूर्वकल्पना रिपब्लीकच्या कर्मचाऱ्यांना आली असेल. नाही तर सुशांत सिंह प्रकरण सुरू असताना मुंबई पोलिस आयुक्त पत्रकार परिषद घेतात, तेव्हा आपला प्रतिनिधी त्या पत्रकार परिषदेला असायला हवा, अशा भावनेनी तिथे पत्रकार पाठवला असता. एकूणच या खळबळजनक पत्रकार परिषदेमुळे वृत्त वाहिन्यांच्या विश्वासाला प्रचंड मोठा तडा गेला आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लिक न्यूज चॅनलचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कारवाई करतात का हे पाहणं महत्वाचे ठरेल. कारण ज्या दोन वाहिन्यांची नावं घेण्यात आली ती अत्यंत लहान होती. पोलिस मोठ्या मासांना कधी अटक करणार असा प्रश्न निर्माण होतो.

 

Web Title: What exactly is a 'TRP scam'? ... Know!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.