False TRP exposed! Ongoing investigation into Republic TV, owners of two Marathi channels arrested | Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत

Breaking : खोट्या TRPचा पर्दाफाश! रिपब्लिक टीव्ही चौकशीच्या फेऱ्यात, दोन मराठी चॅनेलचे मालक अटकेत

ठळक मुद्देफक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र आता रिपब्लीकचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कडक कारवाई करणार असल्याची शक्यता आहे. 

पूनम अपराज / मनीषा म्हात्रे 

मुंबई - चुकीच्या पद्धतीने टीआरपी मिळवण्यासाठी सक्रिय असलेल्या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करून खोट्या टीआरपीचे रॅकेट उघड करण्यात मुंबई पोलिसांना यश आलं आहे. त्यासाठी बदनामी करून पैसे देऊन टीआरपीशी छेडछाड करण्यात आली असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.रिपब्लिक टेलिव्हिजनचे प्रमोटर्स रॅकेटमध्ये सहभागी असून त्याची चौकशी करण्यात येणार आहे. फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा या दोन मराठी चॅनेलच्या मालकांना अटक करण्यात आली आहे.

 

बनावट टीआरपीचे रॅकेटचा भांडाफोड मुंबई पोलिसांच्या सीआययुच्या पथकाने केला आहे. घरात विशिष्ट्य चॅनेल सुरू ठेवण्यासाठी पैसे दिले जात असल्याचं संशय असून टीआरपी रेटिंगमध्ये घोटाळा केल्याप्रकरणी हंसा कंपनीच्या माजी कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. टीआरपीसाठी घरांमध्ये ५०० रुपयांपासून पैसे देण्यात आले होते. फक्त मराठी बॉक्स सिनेमा आणि रिपब्लिक टीव्ही या तीन प्रमुख चॅनेल आरोपी आहेत.रिपब्लिक टीव्हीच्या पदाधिकाऱ्यांना समन्स बजाविण्यात येणार आहे. सहभागी असाणाऱ्या सर्वांवर अटकेची कारवाई करण्यात येणार आहे. कितीही मोठा आरोपी असला तरी संबंधितांवर कठोर कारवाई करणार असल्याची माहिती सिंग यांनी दिली. बँक खाते तपासले जात आहे. फॉरेन्सिक पथकाच्या मदतीने तपास सुरु असून यात रिपब्लिक टिव्हीनेही अशाप्रकारे पैसे घेऊन टीआरपी वाढवल्याचा संशय आहे. अन्य चॅनेलबाबतही चौकशी सुरु असल्याची माहिती मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.  सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे रिपब्लीक टीव्हीच्या संचालकांना आणि संपादकांना मुंबई पोलिस समन्स बजावणार आहेत. आजच हे समन्स बजावले जाणार आहे. दोन चॅनलच्या मालकांना तर पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, आता रिपब्लीकचे व्यवस्थापकीय संचालक अर्णब गोस्वामी यांच्याही विरोधात पोलिस कडक कारवाई करणार असल्याची शक्यता आहे.  

सिंग यांनी सांगितले की, "मोठे रॅकेट हाती लागले आहे." हे रॅकेट बनावट टीआरपीचे आहे. टेलिव्हिजन जाहिरात इंडस्ट्री सुमारे 30 ते 40 हजार कोटी रुपयांची आहे. टीआरपी दराच्या आधारे जाहिरात दर ठरविला जातो. कोणत्या चॅनेलनुसार जाहिरात मिळेल, त्यानुसार निर्णय घेण्यात येतो. टीआरपीमध्ये बदल झाल्यास त्याचा परिणाम महसुलावर होतो. याचा काही लोकांना फायदा होतो तर काही लोकांना नुकसान होतो. टीआरपी मोजण्यासाठी बीएआरसी ही एक संस्था आहे. ते वेगवेगळ्या शहरात बॅरोमीटर लावतात, देशात सुमारे 30 हजार बॅरोमीटर स्थापित केले गेले आहेत. मुंबईत सुमारे 10 हजार बॅरोमीटर बसविण्यात आले आहेत. बॅरोमीटर बसवण्याचे काम मुंबईतील हंसा नावाच्या संस्थेला देण्यात आले होते. तपासादरम्यान हंसाबरोबर काम करणारे काही जुने कामगार टेलिव्हिजन वाहिनीवर माहिती शेअर करत असल्याचे समोर आले आहे. ते म्हणत की, आपण घरी असाल किंवा नसाल , चॅनेल चालू ठेवा. काही लोक जे अशिक्षित आहेत, त्यांच्या घरी इंग्रजी चॅनेल वापरले जात होते. आम्ही हंसाच्या माजी कामगारांना अटक केली आहे. या आधारे तपास वाढविण्यात आला. दोन जणांना अटक करून न्यायालयात हजर केले असून त्यांना 9 ऑक्टोबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्याच्या काही साथीदारांचा शोध घेत आहे. काही मुंबईत आहेत तर काही मुंबईबाहेर आहेत. ते चॅनेलनुसार पैसे द्यायचे. पकडलेल्या व्यक्तीच्या खात्यातून 20 लाख रुपये जप्त करण्यात आले असून आठ लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.

Read in English

Web Title: False TRP exposed! Ongoing investigation into Republic TV, owners of two Marathi channels arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.