शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

काय सांगता! चोरट्याने थेट बिट चौकीतूनच पळवला पोलिसाचा लॅपटॉप; सीसीटीव्हीमध्ये आरोपी कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 15:12 IST

Robbery Case : गुन्ह्याचा तपासासाठी बिट चौकी बंद करून बाहेर पडताच, चोरट्याने बिट चौकीतून पोलिसांची बॅग पळवल्याची घटना नागपाडामध्ये समोर आली आहे.

मुंबई : गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांना त्यांच्याच बीट चौकीतून चोरी झालेल्या पोलिसाचालॅपटॉप आणि सरकारी कागदपत्रे शोधण्याची वेळ आली आहे. गुन्ह्याचा तपासासाठी बिट चौकी बंद करून बाहेर पडताच, चोरट्याने बिट चौकीतून पोलिसांची बॅग पळवल्याची घटना नागपाडामध्ये समोर आली आहे. याप्रकरणी नागपाडा पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरोधात चोरीचा गुन्हा नोंदवत तपास करत आहेत.                

पोलीस उपनिरीक्षक सचिन तावरे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. सोमवारी ते नागपाडा येथील शुक्लाजी स्ट्रीट येथील बिट चौकीत कार्यरत होते. यादरम्यान बेपत्ता असलेली महिला गल्ली क्रमांक ११ मध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, ते तपासासाठी रवाना झाले. जाण्यापूर्वी त्यांची लॅपटॉप सहित कागदपत्रे असलेली बॅग बिट चैकीमधील टेबलखाली व्यवस्थित ठेवली. जाताना बाहेरून दरवाजा बंद केला. ४५ दिवसापासून बेपत्ता असलेल्या महिलेसह मुलाचा शोध घेत त्यांना पुढील चौकशीसाठी नागपाडा पोलिसांच्या ताब्यात दिले. ते  सव्वा चारच्या सुमारास पुन्हा बिट चौकीकडे परतले. तेव्हा, बॅग गायब असल्याचे दिसून आले.  त्यांनी सगळीकडे शोध घेतला मात्र बॅग मिळून आली नाही. शिवाय जाण्यापूर्वी चौकीत असलेल्या अधिकाऱ्याकडेही चौकशी केली. मात्र त्यांनाही बॅगेबाबत काहीही माहिती नसल्याचे समजले. अखेर त्यांनी नागपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.  त्यानुसार, सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलीस आरोपीचा शोध सुरु आहे. 

सीसीटीव्हीमध्ये चोर कैद..बिट चैकी येथे असलेल्या  षासकिय सी.सी.टि.व्ही कमेऱ्याची पाहणी केली असता, साधारण चारच्या सुमारास २२ ते २५ वर्षाचा तरुण कडी उघडून आतमधील बॅग घेऊन बाहेर जाताना दिसत आहे. त्यानुसार पोलीस अधिक तपास करत आहे. अद्याप आरोपीची माहिती मिळाली नसून अधिक तपास सुरु असल्याचे नागपाडा पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :RobberyचोरीlaptopलॅपटॉपPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीcctvसीसीटीव्ही