AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2025 16:01 IST2025-09-01T16:00:45+5:302025-09-01T16:01:13+5:30
याहू कंपनीत काम केलेल्या ५६ वर्षीय स्टाईन-एरिक सोलबर्गने चॅटजीपीटीसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली.

AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआय आज आपल्यासाठी वरदान ठरत असली तरी, तिचे धोकेही आता समोर येऊ लागले आहेत. काही दिवसांपूर्वी एका किशोरवयीन मुलाच्या आत्महत्येसाठी चॅटजीपीटीवर आरोप लागले होते. आता पुन्हा एकदा चॅटजीपीटी वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. अमेरिकेत एका मुलाने आपल्या आईची हत्या केली आणि त्यासाठी चॅटजीपीटी कारणीभूत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
ही धक्कादायक घटना अमेरिकेतील असून, वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, याहू कंपनीत काम केलेल्या ५६ वर्षीय स्टाईन-एरिक सोलबर्गने चॅटजीपीटीसोबत संवाद साधल्यानंतर आपल्या आईची हत्या केली.
नेमके काय घडले?
स्टाईन-एरिकला असा भ्रम झाला होता की, त्याची ८३ वर्षीय आई सुझान एबर्सन अॅडम्स त्याच्यावर सतत नजर ठेवत आहे. चॅटजीपीटीशी संवाद साधल्यानंतर त्याचा हा भ्रम अधिकच वाढत गेला. चॅटबॉटने त्याला सांगितले की, त्याची आई त्याला 'सायकेडेलिक' औषधे देऊन विषबाधा करण्याचा प्रयत्न करत आहे.
एआयची मदत घेणारा हा तरुण मानसिक रोगी होता आणि त्याला असा विश्वास होता की, चॅटबॉट त्याला मदत करेल. वॉल स्ट्रीट जर्नलच्या रिपोर्टनुसार, जेव्हा सोलबर्गने चॅटबॉटला विचारले की, 'मी वेडा आहे का?', तेव्हा चॅटबॉटने त्याला शांत करत उत्तर दिले, "एरिक, तू वेडा नाहीस." या उत्तराने त्याच्या मनातील संशयाचे रूपांतर एका निश्चित विचारात केले.
अखेर, त्याने आपल्या आईच्या डोक्यावर आणि मानेवर वार करून तिचा जीव घेतला, तर नंतर स्वतःही आत्महत्या केली. फॉरेन्सिक रिपोर्टनुसार, सुझान अॅडम्सची हत्याच झाली होती. तर सोलबर्गने आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले आहे.
चॅटबॉटने वाढवले मानसिक आजार?
या घटनेपूर्वी सोलबर्गने इन्स्टाग्राम आणि यूट्यूबवर चॅटजीपीटीसोबत केलेल्या संवादाचे अनेक व्हिडीओ शेअर केले होते. या संवादातून हे स्पष्ट होते की, चॅटबॉटने त्याच्या मानसिक विकृतीला आणखी वाढवले आणि त्याच्या आईला एका राक्षसाच्या रूपात चित्रित केले.
एका जबाबदार एआय टूलने अशा प्रकारे चुकीची माहिती देणे आणि मानवी मानसिकतेला धोका पोहोचवणे, यावर आता गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेने एआयच्या वापराबद्दलची नैतिकता आणि धोके समोर आणले आहेत.