पती झाला हैवान! 'तिने' त्याच्यासाठी घरदार सोडलं पण 'त्याने' तिलाच संपवलं, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2022 16:32 IST2022-08-08T16:17:29+5:302022-08-08T16:32:29+5:30
Crime News : अनिता नावाची तरुणी तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात पडली. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यानंतर अनिताच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली.

फोटो - news18 hindi
नवी दिल्ली - प्रेमासाठी काही लोक वाटेल ते करतात. पण अनेकदा यामध्ये धक्कादायक घटना देखील घडतात. अशीच एक भयंकर घटना आता समोर आली आहे. बॉयफ्रेंडसोबत लग्न करता यावं म्हणून एका तरुणीने कुटुंबाचा विरोध पत्करला. तसेच त्याच्यासाठी आपलं घरदार सोडलं पण त्यानेचा आता तिची हत्या केल्याचं समोर आलं आहे. लग्नानंतर तीन वर्षातच पती हैवान झाल्याचं पाहायला मिळालं. बिहारच्या बगहामध्ये नात्याला काळीमा फासणारी ही घटना घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिता नावाची तरुणी तीन वर्षांपूर्वी अनिलच्या प्रेमात पडली. त्यानंतर 2019 मध्ये दोघांनी लग्न केलं. पण त्यानंतर अनिताच्या सासरच्या लोकांनी तिच्याकडे हुंड्याची मागणी सुरू केली. पैशासाठी तिच्यासोबत सतत भांडण केले जाऊ लागले. तसेच तिला मारहाणही करण्यात आली. अनिलसोबत तिने लग्न केले. त्यानेच तिचा घात केला आहे. बगाहा नगर पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद नगर मोहल्ला वॉर्ड क्रमांक 26 मध्ये राहणारे छोटेलाल चौधरी यांचा मुलगा अनिल चौधरी याची पत्नी अनिता देवी हिचा मृतदेह आढळून आल्याने गावात खळबळ उडाली आहे.
अनिता आणि अनिल चौधरी यांचा प्रेमप्रकरणातून विवाह झाल्याचे गावकऱ्यांनी सांगितले. तरुणीचे वडील सुभाष चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, माझ्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात होता. तीन लाखांची मागणी केली जात होती. हुंड्याचे तीन लाख रुपये न दिल्याने सासरे छोटेलाल चौधरी, पती अनिल चौधरी आणि सासू चिंता देवी यांनी माझ्या मुलीची गळा दाबून हत्या केली असं त्यांनी सांगितलं.
घटनेची माहिती मिळताच, पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि यानंतर शवविच्छेदन करण्यात आले. एसडीपीओ कैलाश प्रसाद यांनी सांगितले की, सुभाष चौधरी यांनी मुलीच्या हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. तसेच पोलिसांनी अनिताचा पती, सासरा, सासू यांना अटक केली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.