शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2025 20:32 IST

West Bengal Crime: कोलकाता लॉ कॉलेज बलात्कार घटनेतील मुख्य आरोपीची एक जुनी पोस्ट व्हायरल होत आहे.

West Bengal Crime: पश्चिम बंगालमधील कलकत्ता लॉ कॉलेजमध्ये झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेने सुमारे एक वर्षापूर्वी कोलकाता येथेच झालेल्या आरजी कर बलात्कार आणि खून प्रकरणाच्या आठवणी ताज्या केल्या आहेत. ८ ऑगस्ट २०२४ च्या रात्री मेडिकल कॉलेजमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थीनीवर बलात्कार करुन तिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. विशेष म्हणजे, अलिकडेच झालेल्या लॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजित मिश्रा याने आरजी कर बलात्कार प्रकरणातील दोषींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती.

पीडितेसाठी मागितलेला न्याय, आता स्वतः केला बलात्कारलॉ कॉलेज बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी मनोजित मिश्राची एक जुनी फेसबुक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. गेल्या वर्षी कोलकाता येथे झालेल्या आरजी कर घटनेनंतर मनोजितने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून 'तात्काळ न्याय' आणि बलात्कारीला फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली होती. त्याने त्याच्या फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते, 'बलात्काऱ्याला फाशी द्यावी, आम्हाला न्याय हवा आहे.' मात्र, आता त्याने स्वतःच एका तरुणीवर अत्याचार केल्याचा प्रकार घडला आहे.

काय आहे कोलकाता लॉ कॉलेज घटना?कोलकात्याच्या लॉ कॉलेजमध्ये २५ जून रोजी झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी आणि मुख्य आरोपी मनोजित मिश्रा, तसेच प्रमित मुखर्जी आणि झैद अहमद या दोन विद्यार्थ्यांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त या प्रकरणात एका गार्डलाही अटक करण्यात आली आहे. 

विद्यार्थिनीला ओलीस ठेवून बलात्कारतक्रारीनुसार, लॉ कॉलेजच्या २४ वर्षीय विद्यार्थिनीला कॅम्पसच्या डी वॉर्डमधील गार्ड रुममध्ये बोलावण्यात आले, जिथे आधीच तीन आरोपी उपस्थित होते. त्यानंतर, या लोकांनी तिला गार्ड रुममध्येच ओलीस ठेवले. पीडितेवर सुमारे तीन तास अत्याचार करण्यात आले. वैद्यकीय अहवालानुसार, पीडितेच्या मानेवर ओरखडे आढळून आले आहेत, तसेच मांड्या आणि छातीवर जखमा आढळल्या आहेत. गुन्हा केल्यानंतर आरोपीने तिला धमकावण्याचा प्रयत्न केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी, पीडितेने पोलिस स्टेशन गाठले आणि पोलिसांना संपूर्ण घटनेची माहिती दिली.

आता या प्रकरणावर बरेच राजकारण सुरू आहे. मुख्य आरोपी मनोजित हा सत्ताधारी टीएमसीच्या विद्यार्थी संघटनेशी संबंधित होता. याशिवाय, आज तकशी झालेल्या संभाषणात त्याचा मित्र तीतस मन्ना याने खुलासा केला की, मनोजित यापूर्वीही कॉलेजमध्ये विनयभंग आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सहभागी होता. तसेच, त्याच्याविरुद्ध विनयभंगाच्या एका प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. वाईट वर्तनामुळे विद्यार्थी संघटनेने त्याला कॉलेजमध्ये असताना बंदी घातली होती. तरीही तो कॅम्पसबाहेर गुंडगिरी आणि विद्यार्थिनींचा विनयभंग करत असे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीwest bengalपश्चिम बंगालcollegeमहाविद्यालयWomenमहिलाMolestationविनयभंगtmcठाणे महापालिका