शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
5
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
6
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
7
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
8
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
9
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
10
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
11
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
12
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
13
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
14
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
15
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
16
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
17
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
18
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
19
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
20
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
Daily Top 2Weekly Top 5

West Bengal Assembly Elections 2021 : धक्कादायक! कार्यकर्त्याचा मतदानादिवशीच आढळला मृतदेह; भाजपाने केला हत्येचा गंभीर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2021 16:14 IST

West Bengal Assembly Elections 2021 : केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे.

कोलकाता - पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूकीसाठीच्या (West Bengal Assembly Election 2021) पहिल्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. 294 जागांपैकी 30 जागांसाठी होत असलेल्या मतदानासाठी मतदाता मोठ्या प्रमाणात बाहेर पडताना दिसत आहेत. सत्ताधारी तृणमूल काँग्रेसभाजपा यांच्यात मुख्य लढत असल्याचे मानले जात आहे. काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीचेदेखील आव्हान राहणार आहे. पहिल्या टप्प्यात पुरुलिया व झारग्राम येथील सर्व मतदारसंघ तसेच बांकुरा, पूर्व मेदिनीपूर व पश्चिम मेदिनीपूरमधील काही मतदारसंघांचा समावेश आहे. याच दरम्यान आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. भाजपा कार्यकर्त्याची हत्या झाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, केशियारीमध्ये भाजपा कार्यकर्ता मंगल सोरेनचा मृतदेह आढळला आहे. या कार्यकर्त्याला मारहाण करून त्याची हत्या करण्यात आल्याचा दावा भाजपाने केला आहे. "घरात घुसून झोपलेल्या भाजपा कार्यकर्त्याला बेदम मारहाण करत त्याची हत्या केली" असं म्हटलं आहे. रात्री मंगल सोरेन बाहेर झोपला होता, सकाळी त्याचा त्याच ठिकाणी मृतदेह आढळला असं सांगितलं जात आहे. भाजपा उमेदवार सोनाली मुर्मु यांनी दिलेल्या माहितीनुसार, "सकाळी असं ऐकायला मिळालं, की बेगमपूर चार नंबर बूथवर एका भाजप कार्यकर्त्याचा मृत्यू झाला. त्याची हत्या करण्यात आली आहे. रात्री तो घराबाहेर झोपला होता, मात्र सकाळी त्याच्या आईला त्याठिकाणी त्याचा मृतदेह दिसला."

"ही अत्यंत दुःखद घटना असून प्रकरणाचा तपास व्हायला पाहिजे" अशी मागणी मुर्मु यांनी केली. सोबतच कार्यकर्त्याच्या शरीरावर अनेक जखमा असून त्याच्या डोक्यालाही मार लागला असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भाजपचे बंगालचे अध्यक्ष दिलीर घोष यांनी माझ्यापर्यंत ही बातमी आली आहे, की हत्या झाली आहे. हे सर्व केवळ भीती पसरवण्यासाठी केलं जात आहे. मात्र, लोक याचं उत्तर नक्की देतील. जे भीती पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यांना लोक सहन करणार नाहीत असं घोष यांनी म्हटलं आहे. 

"दीदींचा खेळ सुरू! राज्यात 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार"

बंगालच्या कूचबिहार लोकसभा क्षेत्रात (Coochbehar) दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांचा फासावर लटकवलेला अवस्थेत मृतदेह आढळला आहे. पक्ष कार्यालयाच्या जवळच त्यांचा मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेवरुन भाजप कार्यकर्त्यांनी तृणमूल काँग्रेसवर जोरदार हल्लाबोल केला आहे. अमित सरकार यांची पूर्व नियोजित हत्याच आहे, असा आरोप भाजपाकडून करण्यात येत आहे. तसेच "राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या झालेल्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असं देखील भाजपाने म्हटलं आहे. 

भाजपाने या प्रकरणाची तक्रार निवडणूक आयोगाकडे केली आहे. मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी या घटनेवर चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी त्यांनी विशेष पोलीस पर्यवेक्षकाकडे संपूर्ण घटनेचा अहवाल मागितला आहे. भाजपचे महासचिव कैलाश विजयवर्गीय  (Kailash Vijyavargiya) यांनी या घटनेवरुन भाजपावर निशाणा साधला आहे. "दीदीचा खेळ सुरू, ममता सरकारच्या राजनैतिक हिंसाचाराचा अंत अजूनही झालेला नाही. कूचबिहार लोकसभा क्षेत्रातील दिनहाटाचे विभागीय अध्यक्ष अमित सरकार यांना टीएमसीच्या गुंडांनी फासावर लटकवलं. राज्यात आतापर्यंत 130 पेक्षा जास्त भाजपा कार्यकर्त्यांच्या हत्येला ममतांचा पक्ष जबाबदार आहे" असा आरोप विजयवर्गीय यांनी केला आहे. 

टॅग्स :West Bengal Assembly Elections 2021पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक २०२१west bengalपश्चिम बंगालTrinamool Congressतृणमूल काँग्रेसBJPभाजपाCrime Newsगुन्हेगारी