शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
4
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
5
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
6
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
7
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
8
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
9
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
10
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
11
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
12
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
13
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
14
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

कोलकाता बलात्कार प्रकरणाला नवं वळण, मुख्य आरोपी संजय रॉयनं जेल गार्डला काय सांगितलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2024 09:52 IST

सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे...

पश्चिम बंगालमधील कोलकात्यातील आरजी कर मेडिकल हॉस्पिटल आणि कॉलेजमध्ये महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येप्रकरणी आज (रविवार 25 अगस्त, 2024) मुख्य आरोपी संजय रॉयची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात येणार आहे. या लाय डिटेक्टर टेस्टपूर्वी आरोपी संजय रॉयने या बल्ताकार आणि हत्या प्रकरणात आपण निर्दोष असून आपल्याला अडकवले जात असल्याचे म्हटले आहे. तत्पूर्वी, त्याने गुन्ह्याची कबुली दिली होती. याशिवाय, माजी प्राचार्य संदीप घोष आणि चार इतर डॉक्टरांसह सहा जणांची लाय डिटेक्टर टेस्ट यापूर्वीच करण्यात आली आहे.

या प्रकरणी कारागृह अधिकाऱ्यांच्या हवाल्याने आलेल्या एका अहवालात सांगण्यात आले आहे की, आपल्याला हत्या आणि बलात्कारासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नाही, असे आरोपीने कारागृहातील सुरक्षा रक्षकाला सांगितले होते. मात्र, कोलकाता पोलिसांच्या म्हणण्यानुसार, संजय रायने आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार आणि खून केल्याची कबुली दिली होती.

संजय रायने 23 ऑगस्टला सियालदह येथील अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर आपण निर्दोष असल्याचा दावा करत, निर्दोषत्व सिद्ध करण्यासाठी टेस्टला संमतीही दिली होती. तसेच आपल्याला यासंदर्भात कसल्याही प्रकारची माहिती नसल्याचेही त्याने म्हटले होते.

संजय रॉयसंदर्भात काय म्हणतायत अधिकारी? -सीबीआय आणि पोलीस आरोपी संजय रॉयची सातत्याने चौकशी करत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, त्याच्या बोलण्यात प्रचंड विसंगती दिसत आहे. त्याच्या चेहऱ्यावर झालेल्या जखमा आणि गुन्ह्याच्या वेळी सेमिनार हॉलमध्ये त्याची उपस्थिती यासंदर्भात विचारले असता, त्याला कसल्याही प्रकारचे स्पष्टीकरण देता आले नाही. तो तपास अधिकाऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. तसेच गुन्ह्याच्या काही वेळापूर्वी सेमिनार हॉलकडे जाणाऱ्या कॉरिडॉरमध्ये तो काय करत होता हेदेखील तो सांगू शकला नाही.

पोर्नोग्राफीचं व्यसन! -आरोपीला संजय रॉयला सेल क्रमांक 21 मध्ये ठेवण्यात आले आहे. त्याच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्याच्या सेलबाहेर सीसीटीव्ही कॅमेरेही लावण्यात आले आहेत. त्याला पॉर्नोग्राफीचे व्यसन असल्याचेही सीबीआयच्या अहवालात आढळून आले आहे. याशिवाय, डॉक्टरांचा हवाला देत तो जनवारांच्या प्रवृत्तीचा असल्याचेही म्हणण्यात आले आहे.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालCBIगुन्हा अन्वेषण विभागdoctorडॉक्टरPoliceपोलिसDeathमृत्यूSexual abuseलैंगिक शोषण