किरकोळ वादातून भोसरी येथे तरूणावर कोयत्याने वार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 3, 2020 20:03 IST2020-03-03T20:02:29+5:302020-03-03T20:03:15+5:30

मंदिरातून घरी पायी चालत जात असताना प्राणघातक हल्ला

weopan attack on youth through a minor dispute in the bhosari | किरकोळ वादातून भोसरी येथे तरूणावर कोयत्याने वार

किरकोळ वादातून भोसरी येथे तरूणावर कोयत्याने वार

पिंपरी : रस्त्याने चालत जात असलेल्या तरुणावर दोघांनी मिळून कोयत्याने वार केले. तसेच त्याला मारहाण केली. यामध्ये तरुण जखमी झाला. ही घटना गवळी माथा, भोसरी येथे रविवारी रात्री पावणे दहा वाजता घडली.
भोसरीपोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश दिलीप बुजवडेकर (वय १९, रा. टेल्कोरोड, भोसरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी फिर्याद दिली आहे. शंकर चौधरी (वय २५), शुभम सुतार (वय २५, दोघे रा. यशवंतनगर, पिंपरी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. रविवारी रात्री रुपेश हे मारुती मंदिरातून घरी पायी चालत जात होता. तो गवळी माथा येथील प्रशांत जनरल स्टोअर येथे आला असता आरोपी दुचाकीवरून आले. आरोपी शंकर याने दुपारी माझ्या घरात कोण शिरले, असे म्हणत कोयत्याने वार केले. आरोपी शुभम याने झटापटी करून मारहाण केली. यामध्ये रुपेश जखमी झाला आहे.

Web Title: weopan attack on youth through a minor dispute in the bhosari