शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

आम्हाला वैभवशी व्यवस्थित बोलूच दिले नाही; वैभव राऊत यांचा पत्नीचा आरोप 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2018 21:17 IST

वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. 

मुंबई - नालासोपारा येथील भंडारअळी गावात वैभव राऊतच्या घरी महाराष्ट्र दहशतवादी पथकाने (एटीएस) गेल्या शुक्रवारी कारवाई करून बाॅम्ब व स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. त्यानंतर राज्यभरात सनातन संस्थेशी संबंधीत वैभवसोबत काही व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले होते. शुक्रवारी वैभव राऊतला न्यायालयाने १८ ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. वैभव राऊतवर करण्यात आलेली कारवाई संशयास्पद असल्याबद्दल चर्चा होत आहे. मात्र, आज दुपारी ३ वाजता एटीएसने अचानक एसआरपी व लोकल पोलिसांना सोबत घेत वैभवला त्याच्या भंडारआळीतील त्याच्या निवासस्थानी पुन्हा चौकशीसाठी आणले होते.यावेळी साधारण ५० मिनीटे त्याची चौकशी करण्यात आली. त्यानंतर पोलीसांनी त्याची इंनोवा गाडी (एमएच ४८, एके २६२६) जप्त केली. त्यावेळी वैभवला त्याच्या कुटुंबियांसोबत बातचीत करण्यास दिली. मात्र, वैभवला आज का व कशासाठी घेऊन आले होते कळले नाही असे वैभवाची पत्नी लक्ष्मी यांनी सांगितले. त्यांनी गाडीचे इन्शुरन्स पेपर सोबत घेऊन गेले. वैभवशी आम्हाला व्यवस्थितपणे बोलूही दिले नाही असा आरोप लक्ष्मी यांनी केला आहे. गोरक्ष संरक्षक असलेला वैभव राऊत याचे सनातन संस्थेशी संबंध असल्याचे तसेच त्याच्याकडे मोठ्या प्रमाणात स्फोटके असल्याच्या संशयावरून त्याच्या नालासोपारा येथील भंडारआळीतील निवासस्थानी एटीएसने गेल्या आठवड्यात मोठी कारवाई केली होती. मात्र, आज दुपारी पुन्हा ३ वाजता एटीएसच्या अधिकाऱ्यांनी वैभवला त्याच्या घरी तोंडावर बुरखा घालून चौकशीसाठी आणले होते. यावेळी परिसरात एसआरपी व लोकल पोलीसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.वैभव राऊतला बुधवारी दुपारी ३ वाजता चौकशीसाठी त्याच्या निवासस्थानी आणण्यात आले होते. त्याच्या पहिल्या मजल्यावरील रूममध्ये जवळपास ५० मिनिटे त्याची चौकशी करण्यात आली. वैभवला घरी आणल्याची बातमी वाऱ्यासारखी नालासोपारा व  वसई-विरार शहरात पसरली. काही वेळातच हजारोंच्या संख्येने गावकऱ्यांनी वैभवच्या घराबाहेर गर्दी केली होती. ३ वाजून ५० मिनीटांनी वैभवला बुरखा घालून पोलीसांनी त्याला घराबाहेर आणले. यावेळी उपस्थित लोकांनी वैभवचा बुरखा काढा.आम्हाला त्याच्याशी बोलायचे आहे. असा आग्रह केला. बुरख्याआड वैभव नाही असा संशयही काही जणांनी व्यक्त केला. मात्र, पोलिसांनी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत वैभवला घराजवळील चिंचोळ्या गल्लीतून घरामागील पोलीसांच्या गाडीत नेऊन बसवले. त्यानंतर काही वेळातच एटीएस, पोलीस  व एसआरपी वैभवला घेऊन निघून गेले.

टॅग्स :Crimeगुन्हाMumbaiमुंबईMaharashtraमहाराष्ट्रAnti Terrorist Squadदहशतवाद विरोधी पथकPoliceपोलिसVasai Virarवसई विरार