शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

तिसऱ्या लग्नाचा हव्यास, पत्नीनं बॉयफ्रेंडला बोलवून घेतलं अन् कांड झालं! लग्नमंडपाऐवजी गेली तुरुंगात; असं काय केलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2025 12:58 IST

तिसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी एक महिलेने बॉयफ्रेंडसोबत मिळून असं काही केलं की ती थेट तुरुंगात गेली.

उत्तराखंडमधील हरिद्वारमधून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासोबत मिळून पतीचा जीव घेतला. तिसरं लग्न करण्याच्या हव्यासापोटी तिने हे भयंकर कृत्य केल्याचं पोलीस तपासात उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, मृत व्यक्ती या महिलेचा दुसरा पती होता.

बागेत सापडला होता मृतदेहप्रकरण पथरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आहे. पोलिसांनी ई-रिक्षा चालक प्रदीप (वय ४८, रा. अंबुवाला) यांच्या हत्येप्रकरणी त्यांची पत्नी रीना (वय ३६) आणि तिचा प्रियकर सलेख यांना अटक केली आहे. १४ जुलै रोजी किशनपूर गावातील एका आंब्याच्या बागेत प्रदीप यांचा मृतदेह आढळला होता. प्रदीपच्या पुतण्याने, मांगेरामने, पोलिसांत हत्येची तक्रार दाखल केली होती.

पहिल्या पतीचाही झाला होता मृत्यू, आता तिसऱ्या लग्नाचे मनसुबे!एसएसपी प्रमेंद्र सिंह डोबाल यांनी तातडीने पोलीस पथक तयार करून या हत्येचा छडा लावण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी प्रदीपच्या मोबाईलचे कॉल डिटेल रेकॉर्ड तपासले आणि गुप्तहेरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे प्रदीपच्या पत्नीवर संशय घेतला. तपासणीत असं समोर आलं की, रीनाचा पहिला पती आजारपणामुळे मरण पावला होता. त्यानंतर १० वर्षांपूर्वी तिने प्रदीपसोबत दुसरं लग्न केलं. पण काही दिवसांतच तिचं त्याच गावातील सलेख नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू झालं. रीनाला आता तिसरं लग्न करायचं होतं, पण पती प्रदीप तिच्या मार्गात अडथळा बनला होता.

असा आला पोलिसांना संशय अन् उघड झालं सत्य!पोलिसांच्या तपासात आणखी एक महत्त्वाचा धागा मिळाला. घटनेच्या दिवसापासून सलेखचा मोबाईल नंबर बंद होता आणि तो गावातून फरार झाला होता. यावरून पोलिसांचा संशय अधिकच बळावला. पोलिसांनी रीनाला ताब्यात घेऊन तिची कसून चौकशी केली असता, तिने आपलं प्रेमप्रकरण आणि कट रचून सलेखच्या मदतीने प्रदीपची हत्या केल्याचं कबूल केलं. रीनाच्या कबुलीजबाबवरून पोलिसांनी हत्येतील आरोपी सलेखला लक्सर रेल्वे स्थानकाजवळून अटक केली. सलेखने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी प्रदीपचा गळा दाबण्यासाठी वापरलेला साफा देखील हस्तगत केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी दोन्ही आरोपींना कोर्टात हजर करण्यात आलं असून, त्यांना न्यायालयीन कोठडीत जेलमध्ये पाठवण्यात आलं आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttarakhandउत्तराखंडhusband and wifeपती- जोडीदार